गुरुवार, १८ मार्च, २०२१
डोकं खराब...
शबरीची बोरं (आधुनिक)
मी आणि माझा बस स्टॉप...
सोमवार, १५ मार्च, २०२१
"दाग अच्छे है"
मला एका प्रसिद्ध आणि अनेक वर्षांपासून गाढा अभ्यास असणाऱ्या होमियो प्याथी तज्ज्ञाने एक पातळ औषध सांगितले आहे पायाला लावायला आणि त्यामुळे "टच वूड" पण मलाच नाही पण अनेक लोकांना फायदाच झाला आहे. मी दररोज दोनदा ते न चुकता लावते कारण फारच सोप्प आहे लावायला, चोळावं लागत नाही, जिरवावं लागत नाही, कारण ते अल्कोहोल बेस्ड आहे. लावलं - रे - लावलं कि क्षणात गायब. इतकं सोप्पं आहे. मग आंघोळ झाली कि ऑफिस चा ड्रेस घालता घालता माझं लावणं चालूच असत. परवा न कळत माझं लक्ष गेलं दोन तीन ड्रेस कडे इस्त्री करतांना आणि मला चिवित्र डाग दिसले कुठे कुठे. मला फारच आश्चर्य वाटलं कि हे स्फटिका सारखे डाग आले कुठून, प्रकर्षाने दिसणारे. माझ्या लहान मेंदूला ताण दिला तर समजलं कि तय्यार होता होता मी जेव्हा हे औषध लावते तेव्हा माझ्या न कळत कधी थेंब पडले आणि त्याचे डाग कधी झाले हे समजलं देखील नाही मला. पण हे "दाग (निश्चितच) अच्छे है". "पाय सलामत तो ड्रेस पचास". असे अनेक ड्रेस घेईन आणि डाग असलेले ड्रेस घालण्यास मला अजिबातच काही लाज वगैरे वाटत नाहीच. किंबहुना असे ऐतिहासिक (माझ्या साठी) ड्रेस मिरवायला मला फार आवडतंय सध्या.
तरुण पिढी आणि गॅझेट...
माझं साधारणतः जे निरीक्षण आहे, जे ऐकतो / वाचतो, अनुभवतो त्यानुसार नवीन पिढी हि सततच गॅझेट वापरात असते, कुठले-ना कुठले उपकरण वापरणारच. कशासाठी? सोशल नेटवर्किंग, गाणे ऐकणे, फोटो टाकणे, वेब सिरीज बघणे, चित्रपट बघणे, रियालिटी शोज ई. मला नक्की माहित नाही. पण अभ्यासासाठी लॅपटॉप चा वापर झाला कि किंवा त्याच्या अधेमधे मोबाइल, त्या नंतर किंवा सोबतच स्मार्ट घड्याळ, काही ठिकाणी टच स्क्रीन जेथे-तेथे त्यामुळे मग ते ई. अगदी तस्सेच मी सध्या अनुभवते आहे. मला मधे कुणी तरी म्हटलं होत कि निवृत्त झालेले / सिनियर सिटिझन पण काही कमी नाहीत, त्यावेळी मला ते पटलं नव्हतं पण आता... सक्काळी पाय अंथरुणातून जमिनीवर टेकण्या आधीच रेडिओ "भुले बिसरे गीत" मोठ्याने, मग बातम्या आधी रेडिओ वर मग दूरध्वनी, ते सगळं चालू असतांनाच वर्तमान पत्र आणि त्या वर चर्चा विथ चहा बिस्किट. काही मिनिटांची आंघोळ पूजा झाली कि पुन्हा टीव्ही चित्रपट, मग जेवण आणि वामकुक्षीच्या आधी रेडिओ जुने गाणे. उठायच्या आधीच जणू पुन्हा रेडिओ किंवा टीव्ही भांडाभांडी बातम्या / क्रिकेट साधारणतः ८-१० तास, त्याच्या जाहिरातीमध्ये बातम्या / सिरीयल / चित्रपट ई. मग ३ तास सलग मराठी सिरियल्स, आणि सरते शेवटी जेवण झालं कि तो डोक्याला ताप "अनु कपूर" घेऊन येतो एका कलाकाराला प्रत्येक दिवशी खास. उगाचच नवीन पिढीच्या नावाने खडे फोडायचे. नवीन पिढी स्वतः तरी ऐकते आपआपले कानात घालून. देवा, कुठे आहेस बाबा तू?
हे सगळं अनुभवताना दररोज, क्षणोक्षणी माझे बाबा मला आठवतात. जर ते असते माझ्या कडे राहायला आत्ता तर ते मी आधीही लिहिल्याप्रमाणे सर्वांच्या आधी उठून आवाज न करता त्यांचं आवरणार, मग चहा करणार, करता करता काही तरी भाजी चिरून ठेवणार, मग शांतपणे उन्हात बसून थोडाच वेळ पेपर चाळणार, माझ्या किंवा मुलांच्या पाण्याची बाटली भरून ठेवणार, चुपचाप एक छोटेखानी बिस्किटाचा पुडा बॅग मधे ठेवणार, गप्पा मारणार, झाडांची निगा राखणार, व्यायाम म्हणून अंगण झाडणार, भाजी / खाऊ / फळं / आईस्क्रीम / मिठाई ई. आणणार, ती भाजी निवडून ठेवणार, थोडी झेपेल तेवढी साफसफाई करणार, आई ग, लिस्ट फारच मोठी आहे. लिहिणार, टिपून ठेवणार, खूण केलेलं वाच म्हणून सांगणार मला आणि स्वतः देखील नर्रेट करणारच. टीव्ही न चुकता फक्त ७-७.१५ संध्याकाळी ठळक बातम्या बास. खूपखूप शिकण्यासारखं आहे त्यांच्या कडून, नेहेमीच.
फुलांच्या वेणीचे मोहक दिवस ...
माझ्या लहानपणी बहुतेक सगळ्याच मुली, त्यांच्या आया आणि शेजारी पाजारी काकू / मावशी ई. बहुतेक लांब केसांची वेणीचं घालत असतं, केस कापण्याची पद्धत नव्हतीच असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शाळेचे नियम वेणी, रिबन घालण्याचे आणि सगळ्याच घरी सारखं वातावरण असायचं बहुतांशी त्यामुळे सगळे सण साजरे होत असतं, आणि सण म्हटलं कि मेहूण, कुमारिका बोलावणं, गोड-धोड करणं हे सगळं यायचंच. त्यामुळे प्रत्येक सणाच्या आधी बाजार अगदी फुलांनी, आणि बाकी पूजेच्या साहित्यांनी बहरून जायचा. त्यात माझ्या सगळ्यात आवडीचं होत ते म्हणजे मोठ्यांचे सगळे खरेदी करेपर्यंत मनसोक्त शेवंतीच्या वेण्या ज्याला विविध रंगांच्या चमक्या / चमकणारा कागद लावलेला असायचा ते न्याहाळत उभं राहायचं, आणि "चेरी व केक" म्हणजे जर तो फुल वाला / वाली जर तो गजरा त्या वेळी तय्यार करत असेल तर प्रचंड परमानंद होत असे सगळी प्रोसेस बघून, त्यांची वैशिठ्य पद्धत बघून. मला पण एक वेणी मिळायची आणि ती प्रत्येक वेळा मी फा$$$रच लकी असल्यामुळे दोन वेगळ्या रंगांच्या चमक्या लावलेली मिळायचीच. अहाहा. स्वर्ग जणू, आनंद गगनात मावत नसे माझा. त्या नंतर मोगऱ्याचा / जाईजुई ई. गजरा असायचा. पण माझं मनापासून प्रेम त्या चमकीवाल्या वेणीवरच. केसांची लांबी रुंदी कमी झाली तशी ह्या वेण्यांची प्रसिद्धी आणि उपस्थिती देखील नाहीशी झाली हो.
मी पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी म्हणून दक्षिणेकडे गेले आणि तेथे भले मोठे बेंडोळे बघितले जिथेतिथे, अबोलीचे, जाईजुईचे, मोगऱ्याचे ई. तेथे फुटावर गजरे हवे तसे कापून मिळतात.
"गो विथ विथ द फ्लो" पद्धतीने सध्या साडी नेसली, काही प्रसंगाला जायची वेळ आलीच कि मी गुलाबाचं विशिष्ट फुल असलेली क्लिप लावते, बास.
शेवंतीची वेणी - जाईजुईचा दाट गजरा - प्लास्टिक फुलाची क्लिप हा प्रवास मी अगदी आनंदाने उपभोगला आहे, ह्याच एका उभ्या छोट्याश्या आयुष्यात. आत्ता ह्या क्षणी हे थोडक्यात वर्णन लिहितांना मी माझ्या आई बाबांसोबत गोकुळपेठ बाजारात शेवंतीचा गजरा बघत उभी आहे. भन्नाट.
For more such Anukatha, find me on Facebook: www.facebook.com/preeti.mulay
रविवार, १४ मार्च, २०२१
केळ ...
मला आता नक्की आठवत नाही पण गेली वर्षे मला अँसिडीटी चा त्रास होत आहे. कधी कधी तर तो इतका जास्त असतो कि ज्याचं नाव ते.
मग काय,
हे खाऊ नका, ते खाऊ नका, किंवा लक्ष ठेवा "काय आणि कि$$ती" खाल्याने त्रास होतो ते. माझी मुलं पण मग काळजीपोटी मम्मा हे खाऊ नकोस असं सल्ला देणार...
का$$$$ही विचारू नका. नाटकं नुसती.
माझ्या सारख्या खवैईला अशी बांधिलकी म्हणजे तुरुंग वासच नाही का? पण काय करणार, अनेक उपाय करून झाले, औषध घेतली, दोन वेगळे डॉक्टर कन्सल्ट करून झाले, हि प्याथी ती प्याथी सगळं म्हणजे सगळं झालं. पण शेवटी "पालथ्या घड्यावर पाणीच". त्रास इतका व्हायचा कि नको वाटायचं. मग मीच ठरवलं गूगल बाबा ला विचारायचं.
बसले एक दिवस ठरवून आणि अनेकविध उपाय मिळाले देखील पण माझ्या सारख्या थोड्याश्या आळशी आणि नोकरी करणाऱ्या ला ते सगळे उपाय उपयोगी नव्हतेच. पण मग तरीही मी जिद्द सोडली नाही आणि सरते शेवटी मला अगदी सहज जमेल असा उपाय सुचला, तो मी ताबडतोब सुरु केला, माझ्या अनेक मैत्रिणींना देखील सांगितला आणि रामबाण ईलाज च जणू अस्सा तो फारच उपयोगी पडला सगळ्यांना. म्हटलं ताबडतोब लिहू आणि ऐकवू यात म्हणजे अजून काही जणींना देखील फायदा होईल. आमच्या घरी काम करणाऱ्या मावशी पण फार परेशान होत्या, त्या देखील आता माझ्या बरोबर हा उपाय करतात आणि आता मस्त आहेत.
अर्थात मी डॉक्टर नाही. त्यामुळे सगळ्यांनी डॉक्टर च्या सल्याने हा उपाय सुरु करावा. पण इतका सोप्पा आणि काहीही दुष्परिणाम होणार नाहीत असाच आहे. संध्याकाळी जेवणाच्या आधी एक केळ खाणे दररोज. बास.
उदाहरणार्थ संध्याकाळी जर तुम्ही ८ वाजता जेवत असाल तर ७ वाजता केळ खा आणि परमानंद उपभोगा. अर्थात बाकी मोजकं खाणं, जपून खाणं , थोडा व्यायाम ई. पाहिजेच. ह्याच्या सारखं दुसरं चपराख औषध नाहीच, माझ्यासाठी तरी. अहाहा. किती लिहू आणि किती नाही असं झालंय मला. सरते शेवटी मिळालेल्या ह्या उपयोगी टीप मुळे माझा आणि अनेक जणींचा त्रास संपला आहे आणि ज्याने हे लिहिलं त्या वेबसाइट वर त्याला शतशः मनापासून धन्यवाद.
Kindly read more such stories on: www.facebook.com/preeti.mulay
On YouTube: https://youtu.be/fsh4tz7RAog (Video in Marathi) https://youtu.be/rEbVGJQnTDU (Video in English) https://youtu.be/z4M_Ls1JjfE (video in Hindi)
LinkedIn: https://www.linkedin.com/in/dr-preeti-mulay-536b43a9/
Twitter: https://twitter.com/DrPreetiMulay
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...