"टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग...." हि अभंगाची ओवी / ओळ आठवली मला, रादर गेले बरेच दिवस आठवते आहेच. कारणं अनेक आहेत, त्या पैकी एक म्हणजे गेले अनेक महिने मी माझ्या महाविद्यालयाच्या खोल्या / वर्ग सगळे बंद आहेत, कुलूप कडी लावून चुपचाप शांत. नाहीतर सर्वप्रथम शिपाई लवकर येऊन आधी खोल्या उघडायचे नॉर्मल दिवस आणि महाविद्यालय सुरु होत तेव्हा. आणि सर्वात शेवटी खोल्या बंद होत असतं, हे सगळं कडी-कुलुपाला खटकलं, जाणवलं, आठवलं आणि म्हणून त्यांनी संवाद साधायला सुरुवात केली आपआपसात आणि अर्थातच तो मला ऐकू आला म्हणून हा लेखप्रपंच.
ते म्हणताहेत "काय दिवस आलेत, किल्यांच्या आवाज ऐकलाच नाही कित्येक दिवस, त्याच स्थितीत पडून राहून शांततेत / शांततेचा कंटाळा आला आहे अगदी, वैताग. महत्वच राहील नाही आता आपलं, गंज चढल्यासारखा झालाय. कुठे गेली ती पिल्लं? त्यांचा आवाज, शिक्षक-त्यांचं शिकवण, प्रत्येक वेळी वेगवेगळ्या शिक्षकांचे वेगवेगळे आवाज आणि तऱ्हा, प्रत्येक वेळी विविध विद्यार्थी वर्गात बसणारे, कॉरीडोअर हुन जाणारे, आच्छाद मांडणारे, ई. एका दिवसात तीनदा आपली जागा बदलत असे (कडी-कुलुप स्थिती, दार आणि कडी उघडलेली स्थिती, आणि पुन्हा संध्याकाळी बंद). आज अनेक महिने एकाच जागी पडिक आहोत, अर्थात शिपायांना थोडासा आराम आहे, किल्ल्यांचा जाडजूड गुच्छ बाळगावा लागत नाही दिवसातून दोनदा, हा वर्ग कोणाला द्यायचा ह्यावरून चर्चा देखील संपुष्टात आल्या आहेत". ई.
"डॉक्टर डू लिटिल" सारखं झालाय माझं. त्यांचं मनोगत ऐकून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहील नाहीच, आणि सगळे इतक्या वर्षांचे भरलेले, बहरलेले, बहारलेलें दिवस आठवले. सगळेच वाट बघत आहेत देवा, विद्यार्थी, शिक्षक, फळा, बेन्च, इमारत, ई. लवकरच सगळं आधीसारखं सुरळीत सुरु होऊ दे हि प्रार्थना.
बुधवार, १६ जून, २०२१
कडी बोले कुलुपाला...
अन्न हे पुर्णब्रह्म
आमच्या कडे हिरव्या मिरच्या चिरण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. म्हणजे पोहे, उपमा, शेवयाचा उपमा, दलिया ई. कशातही हिरव्या मिरच्या घालायच्या असल्या तर त्या मोठ्या आकारात चिरल्या जातात, साधारण: एका मध्यम आकाराच्या मिरचीचे दोन तुकडे, बास. कारण? एक तर चिरायला सोप्पे आणि काढायला देखील, डोळ्याला दिसतात पट्टाकिनी. माझे दोन्ही लेक, छोटा आणि मोठा थोडे वेगळे आणि बदमाश आहेत. ते म्हणतात "आम्हीच वाढून घेतो डिश मधे नाश्ता". आधी मला वाटायचं माझी कित्ती काळजी दोघांना, माझं काम कमी करायचं म्हणून स्वयंसिद्ध वगैरे. पण नीट बघितल्यावर असं लक्षात आलं कि वाढून घेता घेता ते मिरच्या एकतर ओटयावर काढतात किंवा कढईवर च्या झाकणात. मगच खायला घेतात. असो.
तर आमच्या मावशींनी एक दिवशी कमालच केली, त्यांना सगळं माहित असून देखील त्यांना त्या दिवशी बहुतेक पंजाबी होण्याचा शौक चढला होता. इकडे छोट्या लेकाची फरमाईश, "मम्मा पोहे तू कर, मावशीची मदत घेत फक्त". मग मावशींना आणि मला दोघींनाही हुरूप आला, त्यांना फक्तच चिराचारी करायची म्हणून आणि मला फक्त शेफ सारखी फोडणी घालायची म्हणून.
"सगळं चिरलंय, या$$$" अशी आरोळी ठोकल्यावर मी गेले स्वयंपाक घरात, बघते तर काय डोळ्याला दिसणार नाहीत अश्या अगदी बारीक मिरच्या चिरलेल्या.
म्हटलं "हे काय?",
तर म्हणतात कश्या "काय झालं, मिरच्या हायेत",
"आपण अश्या चिरतो का?",
"असुदे, देते दुसऱ्या चिरून",
"आमच्या कडे सगळे वर तोंड करून खातात मावशी",
एवढं मी म्हटलं तर काय पोट धरून हसायला लागल्या आमच्या मावशी, "असं कसं वर तोंड करून खायचं?, "खाली बघून नाही खात कोणी, सगळं लक्ष टीव्ही कडे नाही तर मोबाईल" ई.
"अन्न हे पुर्णब्रह्म" हे विस्मृतीतच गेलं आहे, आधी खा / जेवा म्हटलं तर कोणीही ऐकत नाही.
असो, त्या छोट्याश्या मिरच्यांनी गोड प्रसंग आणि हसू निर्माण केलं हे खरं.
काही थोडे जास्तीचे
आज ठरवून मुहूर्त काढलाच माझी लॅपटॉप ची बॅग साफ करण्याचा. जरा जास्तच जड वाटत होती आणि उगाचच खांदे दुखल्यासारखे पण जाणवायला लागले, म्हटलं बघुयात.
बरीच नक्को असलेली कागदे काढून टाकली, ज्या गोष्टी काढून घरी किंवा ऑफिस मधे ठेवण्यासारख्या आहेत त्या बाजूला काढल्या ई. माझ्या कडे नेहेमीच दोन औषधें असतात, होमिओ पॅथीची, एक म्हणजे मल्टीविटामिन आणि दुसरे म्हणजे अचानक पाय दुखले तर घेण्यासाठी गोळ्या. ह्या दोन बाटल्या त्या-त्या डब्ब्यात पॅकिंग मधे होत्या. म्हणजे वरून पृष्ठा चा डब्बा आणि आत काचेच्या औषधाच्या बाटल्या. त्या दोन्ही पृष्ठाला काढून टाकलं मी, ह्या सगळ्या साफ-सफाई अभियानात, आणि फक्त बाटल्या ठेवल्या. अहाहा काय समाधान मिळालं म्हणून सांगते,
का?
एक तर दोनेक ग्राम वजन कमी झालं, जे च करायला मी बसले होते आणि
दोन म्हणजे पुन्हा एकदा अमेरिकेला जायची किंवा यायची तय्यारी करते आहे कि काय ह्याची झलक अनुभवता आली. जरी आमच्या वेळी ३२ किलो एवढं सामान घेऊन जाता येत होत तरी देखील कशाला उगाच म्हणून सगळे डब्बे / पॅकिंग फेकून द्यायचे आणि माल फक्त बॅगेत भरायचा / घेऊन जायचा. देवा, काय मज्जा येत असे, खरंच.
आम्हाला पॅक करायला आणि समोरच्याला ते गिफ्ट किंवा वस्तू डब्ब्याशिवाय घ्यायला / द्यायला का$$$ही वाटत नसे. तर अशी अमेरिकेची चक्कर मारत मारत सरते शेवटी समाधानपूर्वक मी माझी लॅपटॉप बॅग साफ केली आहे आणि काही ग्राम कमी झाल्याचं सार्थक झाले आहे. वा वा.
घरकाम, व्यायाम आणि बरेच काही
माझ्या लहानपणी घरी सगळ्या कामांना बाई होती, तरी देखील रोज घर आवरणे, धूळ झटकणे, अंगण झाडणे, रांगोळी काढणे, झाडांची निगा राखणे, अचानक आला-गेला सांभाळणे, अधूनमधून पाण्याच्या टाक्या साफ करणे, आणि इतर अनेक कामे असायचीच ज्यामुळे शारीरिक व्यायाम होत होता आणि मानसिक समाधान देखील. हि झाली शहरातली रोजनिशी. खेड्यातली त्याहून निराळी असणार, किंवा शहरातच पण ज्यांच्या कडे दुधाचा, शेतीचा किंवा अजून काही गृहउद्योग आहे त्यांची ह्याहून निराळी असणार रोजनिशी. गाई-म्हशी फिरवणे, गोठा साफ करणे, दूध काढणे, विहिरीतून पाणी काढणे, पाणी भरणे, आणि बरीच कामे. शारीरिक शिस्तीत व्यायाम तर नक्कीच होत होता, शिवाय चरबी कधी वाढली नाही, झोप भरपूर आणि पोटभर शांतपणे आली.
गेले अनेक दिवस मी बघते आहे आमच्या मागे एक watchman च कुटुंब राहत आणि त्यात त्याचा लहान भाऊ पण आहे, असेल २३-२५ वर्षाचा. पहाटे दिसतो मला उठलेला आणि उठला रे उठला कि आडवा पडून मोबाईल, बास, जेव्हा बघावं तेव्हा तेच. देवा. अर्थात माझ्या काकाच काय जातंय, पण हे त्याच्या शरीराला, मनाला आणि एकंदरीत बरे नाहीच. काही उद्योग धंदा मदत नाहीच. काम करण्याची धडपड नाही, काही नवीन शिकायची इच्छा नाही, कमवणे तर दूरच. काय हे. धडधाकट आहे पठ्ठा पण काय उपयोग. संताप होतो माझा पण सोडून द्यावं लागत. कारण असे अनेक असतील ह्या समाजात. सुबुद्धी दे बाबा सर्वांना. बरं माझं म्हणणं असं कि तोच मोबाईल वापरून काही तर दिव्य कर, आणि खरंच काय बघतात एवढं त्या छोट्याश्या स्क्रीन वर सतत दिवसभर / दिवसरात्र तासनतास, फुकट्यासारखं सारखं राहायला लाज नाही वाटत असेल का? आणि कंटाळा कसा नाही येत म्हणते मी?
मंगळवार, १५ जून, २०२१
गाडीचे दिवे
गेल्या काही वर्षांपासून दोन मोठे बदल झाले आहेत १. गाडीचे दिवे पांढरे झाले आहेत / गाडीला पांढरे दिवे बसवले आहेत आणि २. दिवे दिवसा काय सतत चालूच असतात.
मला माझ्या बाबांनी एकदा एका गोष्टीत सांगितलं होत कि अगदी पूर्वीच्या काळी म्हणे फक्त राजेरजवाड्यांना एक मान होता. त्यांच्या गाडीला तेव्हा उपलब्ध होते तसे कंदील / दिवे कधीही लावता येत होते, अंधारच पडला पाहिजे असं काही नव्हतं. राजाची खास गाडी, किंवा राजाची सवारी आहे हे दर्शविण्याचा एक प्रकार होता तो.
आता राजवट संपून अनेक दशकं झाली आहेत, मग आत्ताच हे दिव्यांच प्रकरण का?
एक दागिना आहे म्हणे तो अनेक गाड्या तय्यार करणाऱ्या कंपनीच्या दृष्टीने, आणि चालवणाऱ्याला एक कमी बटन दाबावे लागेल जर दिवे सतत चालू ठेवले तर, ते / चालवणारे विसरणार नाही हेडलाईट चालू करायला जेव्हा लागेल तेव्हा, ई. असे अनेक वेबसाइट्स वर लिहिलं आहे.
आधुनिक राजेच ना सगळे चालवणारे, काही जण तर फक्त आपलाच रस्ता असल्यासारखे च चालवतात गाड्या, भयानक. इतका सुरेख उपयोगी सूर्यप्रकाश असतांना नसतं डोकं का चालवतात कंपनी वाले कोणास ठाऊक का अजून काही अतिमहत्वाचं कारण आहे पांढरे दिवे सतत चालू ठेवण्यामागे ते शोधून काढलं पाहिजे मला, लवकरच.
रविवार, १३ जून, २०२१
नाचता येईना अंगण वाकडे
माझा लेक जरा हटके आहे, आणि त्याचा सवयी देखील. तो सतत सगळ्या गोष्टीना थडकत असतो, स्वतःच्या राहत्या घरात बर का मंडळी, आश्चर्यच आहे, खरंच. त्याच्या खोलीतल्या पलंगाला धडकतो, रोज लागत पायाला. जिन्यावर रोज आणि प्रत्येक वेळी चढतांना उतरतांना पाय ट्विस्ट होतो, नाहीतर पायरीची छोटीशी ठेच लागते, स्वयंपाक घरातले ड्रॉवर लागतात, देवा. काय म्हणावं का$$$$ही कळत नाही मला. धन्य आहे. आणि त्यावर सतत म्हणतो कसा "काय बेक्कार जिना आहे हा?" तसेच "ओह गॉड, हा पलंग नेहेमी माझ्या पायाच्या मधे मधे का येतो ?", "सगळं मलाच का लागत सतत?" ई. स्वतःशी त्याचा संवाद सतत चालूच असतो. मी मागे एकदा माझ्या एका अनुकथेत लिहिलं त्याप्रमाणे देवाचं नाव काही मिनिटात शेकडो वेळा घेतलं जात. किती लकी ना सातत्याने देवाचं नाव घेतो बेटा.
पण अजूनही आता १८ वर्ष पू$$$$$र्ण होणार तरी देखील अजिबात accept करणार नाही, "नाचता येईना अंगण वाकडे.....". अवघड अवघड आहे, पण मला फार मज्जा येते रोज. पोट धरून हसते मी, बास, अजून का$$$$ही नाही माझ्या हातात हो मंडळी. शिंग फुटलेल्या ला काहीही सांगायला नक्को रे बावा.
अंगवळणी पडलेल्या सवयी
खूप दिवसांपूर्वीची हि छोटेखानी गोष्ट आहे. तर त्याच असं झालं कि मधे एकदा माझ्या सासूबाई आजारी पडल्या, जे फार रेअर आहे, त्यामुळे सगळेच हादरले आणि हजर झाले त्यांची सेवा करायला / त्यांच्या सोबत राहण्याकरता ई. त्यात जाऊबाई, पुतण्या असे सगळे पण तब्येतीची कुरबुर करत होतेच. हा जरी संदर्भ असला तरी देखील रोजच्या सवयीप्रमाणे, आणि अनेक वर्षाच्या सवयी हो, भूक त्या त्या वेळी लागणारच, नाही का?
हॉस्पिटल च्या चकरा, सगळ्या वेळा बदलल्या कारण माझ्या जाऊबाईंकडे उदारहणार्थ संध्याकाळचा चहा फॉर example आमच्या घरच्या वेळेपेक्षा फार उशिरा होतो. आमच्या ह्यांनी सगळं निमुटपणे नवीन वेळेपणे, आणि जेवणाच्या पद्धतीपणे अडजेस्ट केलंच, आम्हाला सांगितलं सुद्धा. मला थोडसं वाईट नक्की वाटलं पण त्याही पेक्षा ह्या जगातल्या तमाम मुली आठवल्या आणि त्यांच्या बद्दल प्रचंड अभिमान वाटला पुन्हा एकदा.
जवळपास २५ वर्ष आईकडे राहून, तिथल्या खायच्या प्यायच्या सवयी घेऊन जेव्हा सासरी येतात तेव्हा काय होत असेल? बहुतेक गडबडच. अर्थात बरेच चांगले सासरचे असतात, वादच नाही, पण सगळेच नाही हो. वेळ लागतो पण शेवटी नवीन सवयी / वेळा / खाण्यापिण्याच्या पद्धती आत्मसात केल्या जातातच, कारण काही पर्याय नसतोच. हसतखेळत कधी त्यांच्या होऊन जातो हे कळत देखील नाही. होप आता तरी थोडीशी झलक मिळाली असेल माझ्या "ह्यांना" आणि थोडीशी उपरती पण आली असेल. असो. अशीच उपरती सर्वांना होवो हीच ईश चरणी प्रार्थना. म्हणजे सगळ्या माझ्या सख्यांना थोडे अजून सुखाचे दिवस अनुभवता येतील. सगळ्यांना घरच्या जेवणाचं, तपशीलवार वेळ पाळण्याच, वैविध्यता प्लॅन करण्याचं, आवडीनिवडी जपण्याचं महत्व पटेल.
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...