शनिवार, १७ जुलै, २०२१

थिएटर निरमा सामोसे आजी

माझ्या लहानपणी मैदानी खेळ, प्रत्यक्ष गप्पा, एकमेकांशी भेट, भरपूर हसणं ई. वर जास्त भर होता कारण आजकाल सारखी स्क्रीन / काचेचा-पडदा सहजी उपलब्ध नव्हताच कुठेच. त्याच प्रकारात मग चित्रपट गृहात जाऊन चित्रपट बघणे हि भली-मोठी पर्वणीच होती. का? सांगते. "वॉशिंग पावडर निरमा" ह्या उत्पादनाची जाहिरात टीव्ही वर फक्त काही सेकंद दाखवायचे. त्यात फार कमी टीव्ही होते तेव्हा आणि त्यात फक्त दूरदर्शन हे एकच चॅनेल / वाहिनी. देवा. त्याच्यामुळे आम्हाला "ती" काही मिनिटांची$$$$ निरामाची जाहिरात बघण्यात सगळ्यात जास्त इंटरेस्ट, भल्यामोठ्या पडद्यावर. अजून एक उत्सुकता म्हणजे तिकिटाच्या रांगेत लागून तिकीट मिळवणे, थेटर मधे प्रवेश केल्यावर भल्यामोठ्या आकाराचे पोस्टर्स बघणे ज्यात संपूर्ण गोष्ट चित्रित केली असायची, ते भव्य दिव्य महागडे स्वप्नातीत पोशाख आणि बाकी सगळ्या गोष्टी बघून तो चित्रपट काय असेल हे इमॅजिन करणे ई. जगावेगळी अनुभूती असायची ती.

मग चित्रपट सुरु व्हायचा, संपूर्ण पैसा वसूल पापणी न हलवता बघायचा, मध्यंतर कधी व्हायचं समजायचं देखील नाही, आणि मग समोस्यांचा फडशा पडायचा. बाप रे, मज्जेच्या पुढची पायरी होती ती. मग चित्रपट संपला कि त्या आठवणीत घरी परत, आणि त्याच आठवणीत रममाण काही पुढचे दिवस. अश्या सगळ्यांसाठी जायचं चित्रपट बघायला, अर्थात कधी कधी.  

सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे माझ्या शेजारची मैत्रीण, तिची आजी, अतिउत्साही. आम्हा जवळपास ६-७ जणींना चित्रपट, प्रदर्शनी आणि इतर ठिकाणी घेऊन जायची तय्यारी त्यांचीच. त्याच पुढाकार घ्यायच्या. मग काय आम्ही तर एका पायावर तय्यार. आई बाबा पण काही म्हणायचे नाही कारण भरभक्कम सोबत असायची. वा.

आज वर्तमान पत्रात एक छायाचित्र आले आहे, एक नवीन उद्यान सुरु होत आहे पुण्यात, भले मोठे डायनोसार दिसत आहेत. ते बघून माझी मुलं विचारतात कशी "मम्मा तू बघितलास का हा चित्रपट डायनोसारचा?" आणि ह्या सगळ्या चर्चेला उधाण आलं, आठवणी जाग्या झाल्या. माझ्या लहानपणीचा एक चित्रपटच जणू पुन्हा डोळ्यासमोर उभा ठाकला. 

#Movie #MovieExperience #MyChildhoodMemories #TicketsFromWindow #Samosa #HugeBanners #ACHall #Dinosar #Grandma #AwesomeExperience

चहा-पोळी

माझ्या लहानपणीच्या विश्वातील आणि खूप आवडणारा असा न्याहारीचा प्रकार होता चहा-पोळी. त्यात भरीसभर म्हणजे आई प्रेमाने थोडीशी जास्त साखर घालून दुधाचा स्पेशल चहा करायची आणि थोडसं तूप लावलेली पोळी, देवा, ह्या जगा पलीकडले असेच.... भन्नाट अनुभव होता / आहे तो. अर्थात कधी कधीच हि पर्वणी अनुभवायला मिळायची मला. बाकी दिवशी नेहेमीचेच पोहे, उप्पीट, शिरा, सांजा असे प्रकार होत असतं नाष्ट्याला. आधी एक दोन पोळीचे  घास चहात बुडवून, मग straw म्हणून वापरायचं, सरते शेवटी तो उत्कृष्ट चवीचा अगदी घोटभर उरलेला चहा फस्त करायचा. अहाहा. क्या बात है, आत्ता ह्या क्षणी हे लिहितांना सुद्धा माझ्या तोंडाला पाणी सुटले आणि ते दिवस अख्खे / जसे च्या तसे डोळ्यासमोर उभे ठाकले.

आज मला हे का लिहावंसं वाटलं? सांगते थांबा. आजच्या वर्तमानपत्रात एका बातमीने माझं लक्ष वेधून घेतलं, त्याचमुळे हा लिखाणाचा उहापोह. तीन तरुण मुलांनी फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर "चहा-पोळी" चा नवीन उद्योग सुरु केला आहे आणि तो लोकांच्या पसंतीस पडला आहे. हि बातमी वाचता क्षणीच माझ्या सगळ्या आठवणी पुन्हा एकदा माझ्या लेकरांसमोर मांडल्या, थँक्स तो रविवार, सगळे घरी आणि शांततेत होते. पोटभर गप्पा झाल्या त्यामुळे. मज्जा आली. आणि त्या नवीन उद्योगात म्हणे तेलाची पोळी, तुपाची पोळी आणि विविध प्रकारचे चहा मिळतात. डोकं चालवलंय मुलांनी, कौतुक करावं तितकं थोडच. आज नॉर्मल दिवस असते तर ताबडतोब प्रत्यक्ष जाऊन त्यांना शाबासकी दिली असती. पण नक्की आज जमल्यास त्यांच्याशी मी बोलणार फोन वर. "आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग" म्हणजे अजून काय? हेच. विस्मृतीत गेलेलं पुढे आणणे नव्या स्वरूपात, आणि घरच्यासारखं देण्याचा प्रयत्न करणे ज्यांना आवश्यक आहे त्यांना. मस्त पोटभरीची न्याहारी आहे हे नक्की. धन्यवाद धनश्री पाटील आणि दोन्ही अक्षय ह्यांना. तुमची खूप भरभराट होऊ दे हि प्रार्थना.   

For more details, please watch https://www.esakal.com/video-story/chaha-chapati-hotel-pune-2 and also on https://www.youtube.com/watch?v=YqDxMW8fYvU

#tea #tea-roti #breakfast #healthy #stomach-full #nutritious #easy-breakfast #popular-breakfast #common-breakfast #RotiWithGhee #RotiWithOil #ExtremelyTasty #MilkTea #LittleMoreSugar


शुक्रवार, १६ जुलै, २०२१

पोचा

आज सकाळी थोडीशी आवारासावरी करत असतांना कॉफी टेबल वर गोष्टी मी एकावर एक रचून ठेवल्या. त्या लगोरीत सगळ्यात वर माझा ऑफिस ला न्यायाचा स्टील चा डब्बा होता. सहज मनात विचार आला अरे जर धक्का लागलाच तर हा डब्बा पडेल आणि त्याला पोचा येईल.

मग लक्षात आलं कि अनेक वर्षात मी पोचा आलेलं भांड बघितलंच नाही. कारण अनेक आहेत. कारण सध्या चा जमाना हा नॉन-स्टिक चा, काचेचा आहे, अल्युमिनियम / हिंडालियम, पितळ, स्टील हे फार कमी झालाय वापरणं. त्यात आजकालच्या फारश्या इतक्या नाजुक आहेत कि भांड हातातून जर चुकूनमाकून पडलंच / निसटलंच तर त्या फरशीला छोटासा तडा जातो. आधीच्या फारश्या अतिशय दणकट / दगडी जणू आणि त्यात जुने भांडे, म्हणून पोचा प्रकार होता. आता काय १८-२० वर्षा पूर्वीच मी अमेरिकेत असा भांड्यांचा सेट घेतला होता जो जाड काचेचा होता आणि थ्री-इन-वन अश्या स्वभावाचा होता. त्यात नेहेमीच्या भांड्यांप्रमाणे गॅस वर ठेवून शिजवता यायचं, दिसायला एवढा देखणा होता कि कि डायनिंग टेबल वर ठेवता यायचा आणि मिक्रोवेव्ह मध्ये सुद्धा, धुवायला अगदी सोप्पा. भारतात उत्तम दर्जाचे नॉन-स्टिक भांडी आहेत त्या पण व्यवस्थित जाड असतात च. त्यामुळे माझ्या मुलांनी पोचा ना बघितला ना ऐकला. स्नानगृहात पण आजकाल रंगीबेरंगी प्लास्टिकचे मग्गे असतात त्यामुळे हातातून तांब्या निसटला आहे आणि त्याला अनंत पोचे पडले आहेत असं होतच नाही, किंवा सगळ्यांचा शॉवर जास्त प्रिय.

आणखीन एक पैलू म्हणजे आजकाल सगळे इतके सौरटेड आणि क्लिअर आहेत ना त्यामुळे आधी ऐकिवात येणारे प्रसंग आता होत नाहितच, जसे कि राग आला आणि फुलपात्र / पेला फेकून मारला आणि त्यामुळे पोचा आला, छे. नॉनस्टिक भांड्यांचा स्वभाव आत्मसात झाला आहे नकळत सगळ्यांना काहीही चिटकून घ्यायचं नाहीच अंगाला, पण झटपट चविष्ट पदार्थ पण तय्यार होणार त्याच बरोबर. मज्जा आहे कि नाही.

आणि अर्थात पोचा आलेली भांडी घरात ठेऊ नयेत असं पण म्हटलं जायचं, ऐकलं आहे मी. त्यामुळे बरंच बरं कि, पोचेच येत नाहीत तर तसली भांडी ठेवणं वगैरे फारच दुरची गोष्ट झाली आजकाल. जे होत ते योग्यच.

लेक समोरच होती, तिला मग मी मनात आलेलं सांगितलं, तर म्हणते कशी आधी "मला माहिती आहे मम्मा पोछा म्हणजे काय", देवा, कुठे पोछा आणि कुठे तो पोचा. मग म्हणाली "ओह यू मिन डेन्ट", म्हटलं जाऊ च दे.  

तर हि अशी पोच्याची साठा उत्तराची कहाणी सफळ संपूर्ण. 



बदलेली भूमिका

लहानपणी आई म्हणून आणि काळजी म्हणून माझ्या मुलांना शाळेत जातांना रोज अनेक वर्ष मी घरचाच डब्बा दिला. किंबहुना डब्बे दिले रोज, छोट्या सुट्टीचा, मोठ्या सुट्टीचा आणि कधी कधी बसचा पण. अर्थात माझ्या सारख्या सगळ्याच आया करतातच हे. मी काही नवीन केलं असं नाही. पण आज माझ्या बाबतीत एक फारच नवीन गोष्ट घडली म्हटलं लिहावं.

मुलं माझी लहान होती तेव्हा दोन कारणांमुळे मला त्यांना पोळ्यांचे / पराठ्याचे / दोसा आणि कधी कधी इडलीचे सुद्धा, डब्ब्यात तुकडे करून द्यायला आवडत असे. एक म्हणजे मुलं लहान होती, तुकडे करणं कदाचित जमणार नाही म्हणून आणि जेव्हा मोठी झाली तेव्हा फटाफट डब्बा खाऊन खेळायला पळायचे असायचे त्यांना. मग रेडिमेड तुकडे असले कि मग मज्जाच.

त्यात माझा वेद फरमाईश करायचा वेगवेगळ्या आकाराची, मग कधी घाईत जमतील तसे, नाहीतर ठराविक चौकोनी, त्रिकोणी असे तुकडे करून देत असे मी डब्ब्यात.

आज हा विषय का म्हणताय मंडळी. तर त्याच असं झालं कि गेले १५ दिवस मला जबरदस्तीची रजा मिळाली आहे. पहिल्यांदा इतक्या वर्षांनी मला अजिबात ठाऊक नाही माझ्या स्वयंपाक घरात काय चाललंय. अहाहा. मज्जा येत आहे एका अर्थाने. मी थोडीशी धडपडले त्यामुळे डॉक्टरांनी पाय बांधून ठेवायला, सरळ म्हणजे सरळ ठेवायला आणि त्यावर वजन न द्यायला सांगितल्यामुळे मी सध्या "काऊच पोटॅटो" / "गुळाचा गणपती" असं काहीस झालाय. आज कित्येक दिवसानी कचेरीत गेले. थंड पोळी खाण्याचा कंटाळा येणारच हे मला अवगत होत, त्यामुळे मी माझ्या मनी माऊ ला म्हटलं मला न भाजी एका डब्यात आणि पोळीचे तुकडे फॉईल मधे दे. तिला आश्चर्य वाटलं आधी पण मग तिने उत्कृष्ट पद्धतीने माझा डब्बा भरला, आणि तो मी खूप एन्जॉय करून फस्त केला, आयते तुकडे वगैरे म्हणजे काय राव, माझ्या सारखी भाग्यवान मीच, नाही का?

आज अनेक वर्षांनी भुमिकेची अक्षरश: अदलाबदल झाली. आणि ह्याच एका गोष्टीमुळे नाही हो, कधी कधी फार उत्तम पद्धतीने माझी लेक मला समजावून सांगते, टिपिकल पद्धतीने "मम्मा तुझंच वाक्य सांगते मी तुला पुन्हा...". असं म्हणून थोडक्यात उत्तर दिलेलं असत तिने. क्या बात.

ह्या छोट्याश्या प्रसंगामुळे हि अनुकथा साकारली, बास.

बुधवार, १४ जुलै, २०२१

प्रश्नाचे चोख उत्तर

मला आज सहज सुचलेलं असं काही, थोडक्यात:

वेद ला एका दुकानात जायचं होत / आहे आज. सध्या विविध बदलत्या नियमानुसार नक्की दुकान कधी उघड राहत हे माहित नसतं. तेव्हा सकाळी सकाळी मला म्हणाला "आता?" म्हटलं सोप्प आहे, विचार गुगल-बाबाला, त्याच्या कडे बहुतांशी सगळ्याच प्रश्नांची उत्तर असतातच. तुमच्या काळी इतकं सोप्प आहे हे सगळं, मग का प्रश्न पडतात रे?

आमच्या वेळी अशी सुविधा नव्हती आणि गरज पण नव्हती, सगळं सरळ साधं होत आणि गणपती बाप्पा पुरेसा होता गप्पा मारायला, प्रश्न विचारायला गरज पडल्यास. सध्या इतके डोंगरा एवढे प्रश्न उत्पन्न झालेत चहुबाजुंनी म्हणूनच गणपती बाप्पाने नवा अवतार उभा केला त्याच्याच आधुनिक नावाचा / त्याच्याच पहिल्या अक्षरापासून सुरु होणारा आणि मांडला जगा समोर, ज्ञानाचं भंडारच जस. गरज असेल तेव्हाच वापरावं ह्या नवीन अवताराला, उगाच उठसुठ नको. आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे, संगणक तंत्रज्ञान ज्यांना अवगत आहे त्यांनी त्यांनी ह्या अत्याधुनिक बाबाच्या ज्ञानात भर घातली पाहिजे, नुसतंच वापरून सोडून देण्यात अर्थ नाही. गुगल बाबाच्या माहितीत नवीन नवीन भर घालत राहिलात तरच ती सगळ्यांच्या कामी येईल जेव्हा हवी तेव्हा, नाही का?

असा आमचा आज सकाळी छोटासा भन्नाट संवाद झाला, दिवसाची अप्रतिम सुरवात झाली, गणपती बाप्पाचं आणि त्यांच्या आधुनिक रूपाचं नाव घेतलं गेलं आणि वेद च कामही झालं. त्याला हवा तो दुकानाचा नंबर गवसला, सापडला, दुकान उघडलं कि तो फोन करून जाईल, काम करून येईल.

मनापासुन शतशः धन्यवाद माझ्या लाडक्या बाप्पाला, आज आणि नेहेमीच, सदोदित, प्रत्येक पडलेल्या प्रश्नांचं प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष रूपात / स्वरूपात चपराख उत्तर दिल्या बद्दल, मार्ग सुचवल्या बद्दल. 

मंगळवार, १३ जुलै, २०२१

एक पदार्थ पोटभर

मला आठवतं तेव्हा पासून, माझ्या आईकडे आम्ही सगळेच बहुतेक भरपूर भात-आमटी, भात-उसळ, वरण-फळ, कण्या ई. खात होतो. नेहमीच्या साग्रसंगीत वरण, भात, भाजी, पोळी, कोशिंबीर ला फाटा असायचाच.

दिवाळीच्या एक दिवशी, जेव्हा आईचा हात थोडासा रिकामा आहे तेव्हा माझ्या काही मैत्रिणी, त्यांच्या बहिणी ई. येत असतं. मोठं वाडगं भरून आई टमाटो ची अप्रतिम चविष्ट अशी चटणी करायची आणि गरमागरम चकल्या. बास. आम्ही सगळ्या डायनिग टेबलवर यथेच्छ ताव मारत आणि आई बिच्चारी तळत आणि वाढत. "आन दो" अश्या पद्धतीने भरपेट फस्त होत असत चकल्या.

गणपती चे दिवस आले,स्थापना झाली कि दिड / तीन /  पाच / सात आणि दहा अश्या विविध दिवशी विसर्जन झाले गणपतीचे कि त्यांचा प्रसाद भरपूर मिळत असे, दोन्ही हातांची ओंजळी भरूनच, आणि ते कित्येक वेळा, मोजून मापून नाहीच काही. बास. शेजार-पाजार, मैत्रिणी, गल्लीतले मंडळांचे ई. त्यामुळे प्रसादाला काही कमी नाहीच. वाटली डाळ, मोदक, नारळ, मुरमुरे आणि  बरेच काही असायचे प्रसाद म्हणून. अहाहा. देवा. हे सगळं खाल्यावर आई कधीच मला घरी रात्रीच्या जेवणासाठी धरत नसेच, आणि अशक्यच होत ते.

माझ्या एका मैत्रिणीकडे जी अगदीच मागच्या गल्लीत राहत होती,  तिच्या कडे वर्षभराचं गणपती असे. त्यांच्या कडे एक लै भारी प्रसाद जगावेगळा असा होत असे, भरपूर ओला नारळ आणि सगळ्या प्रकारचा सुकामेवा, अहाहा, मग काय विचारात, पुन्हा एकदा ओंजळ भरूनच. तसं बघायला गेलं तर प्रसाद हा अगदी थोड्या प्रमाणात घ्यायचा असतो,  पण मला हि व्याख्या माहितच नव्हती. सवाल च नाही. लाज वगैरे तर नाहीच.

खास करून माझे बाबा आणि बाकी सगळेच खवैये होते त्यामुळे शनिवार रविवार अजूनच धमाल असायची. काही तरी वेगळं स्पेशल करायचे मी, आणि मग मैत्रिणी, शेजारचे ई. सगळ्यांसोबत मोठ्या प्रमाणात खाणं होत असे. त्यानंतर जेवण शक्य नसायचंच.  
 
उन्हाळ्यात पोटभर घरी हाताने सगळ्यांनी मिळून केलेलं पॉट आईस्क्रीम असो, नाही तर दिनशॉ, त्यानंतर जेवण नाहीच. असे सगळे वेगळे दिवस होते ते. आत्ता मला समजलं / उमगलं कि मला रात्रीच्या जेवणात काही तरी वेगळं, एकच भरपेट पदार्थच का जास्त भावतो ते?. त्याच उत्तर अनेक वर्षा आधीच्या सांभाळल्या, उपभोगलेल्या अनोख्या जगावेगळ्या माझ्या खाण्याच्या सवयी.

One Dish Meal

Since when I am able to recollect, dinners at my mom's place used to be Varan-Phal / Dal-Dhokli, Rice-Curry with raita, Kanya, Daliya etc.

During Deepavali days, at least one special little relax day few of my friends used to come home late evening, my mom used to make fresh Chakli and her special Tomato Chutney. We used to eat it together and on really large quantity so much that no dinner there after for sure. Why so much large quantity? simple, those days Chakli used to be made only during Diwali, not like today, everyday is a Chakli day, nope. Hence the interest in consuming large quantity with interest with most enthu mom in the world, then what else to ask for. Wow.

From the day 2 of Shree Ganapti sthapana, my dinner used to be wholesome Prasad after HIS immersion / visarjan of 1.5 / 5/ 7/ 10 days of Ganapati. Prasad = Special Vatali Dal, Cocount and what not. Wow. I used to consume it in so much of quantity, dont ask and that too from many houses. Yummy. The same set of friends who used to come to eat Chakali at my house, they had Shree Ganapati for the entire year. So they had a special Prasad which was made using fresh grated coconut, rock / raw sugar and all types of dryfruits. I used to eat rounds of it in my both hands full. Of course after so many rounds of huge quantity of Prasad, my mom never used to count me in for the dinner at home. No questions asked. Very simple and crystal clear.

As my dad especially was really foody, he always motivated me to make varied dishes at home, so weekends used to have more dhamal. Those were the days when doors used to be open and everyone was welcome at my place. Almost all variety of menu we used to relish with friends and neighbors. Hence again after eating specially prepared food dish then no question of normal / proper dinner, right?

Now today I finally realized, why I am a huge fan of "one dish meal" and not a proper spread including Sabji, roti, dal, chaval etc. specially for dinner. Hmmmm, the roots are in my childhood food consumption opportunities, which I thoroughly enjoyed. OMG.


2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...