माझ्या लहानपणीपासून एकच प्रकारचं पेन ठाऊक होत मला / आम्हाला, शाईचं, निब असलेलं. ते एक दररोज च काम असायचं, शाळेची तय्यारीतलं एक, शाई भरणे. मस्त प्रकार असायचा तो, पेन उघडायचा, शाईचं दौत उघडायचं, मग ड्रॉपर ने शाई भरायची. कधी ती सांडायची, कधी डाग लागायचे, विचारू नका, हात, फडकं, टेबल ई. बरबटयाच. शाळेच्या गणवेशावर उडायची शाई, वह्या पुस्तकांना, दप्तराला लागायचे डाग जर पेन गळत असला तर. पेन गळत असला तर हाताची बोट पण बघण्यासारखी होत असतं. काय दृश्य होतं ते, सर्वत्र सारखच, सगळ्यांच्या एक तर बोटाला, दप्तराला, वाहिला, पुस्तकाला शाईचे डाग असणारच. अर्थात "दाग अच्छे है", हे ब्रीद वाक्य तेव्हा प्रचलित नव्हतं हे आम्हाला माहितच नव्हतं. आम्ही ते डाग मस्त मिरवले, उपभोगले अहाहा च, सलग अनेक वर्ष. त्यानंतर आले कि हे-ते पेन पण शाईच्या पेनाची जागा शाबूत राहिली, अढळ अशी. आज ह्या सगळ्याची का आठवण आली, सांगते. अहो एक दिग्गज कंपनीचं पेन मला कोणी तरी भेट म्हणून दिल, ते मी अत्यानंदाने वापरायला सुरवात केली, आणि लिहिता लिहिता अचानक मला माझ्या बोटांना काही तरी वेगळं जाणवलं, बघते तर काय, शाई लागली माझ्या हाताला, कित्येक वर्षांनी. अगदी शाळेत गेल्यासारखं जाणवलं, ते बेंच आठवले, ते सवंगडी देखील. इतकं महागडं पेन, भेट ती देखील पण शाई बाहेर आल्यामुळे बाहार आली, आठवणी जाग्या झाल्या, पुन्हा विद्यार्थी झाल्यासारखं वाटलं आणि १० हत्तीचं बळ देऊन गेलं. असं वाटत होत कि तो हात तसाच जपून ठेवावा अनेक दिवस. पण मग फोटो फॉर्म मधे जपला आणि हे लिहायला घेतलं. धन्यवाद पेन आणि असाच अधेमधे शाई बाहेर टाक म्हणजे माझ्या बोटांचं सार्थक झाल्यासारखं वाटेल.
सोमवार, २८ मार्च, २०२२
स्पा
आवडीपेक्षा आराम हि स्पा मागची कल्पना, संकल्पना आहे, होती आणि राहणार. दररोज च्या धावपळीनंतर स्पा म्हणजे स्वर्गच, पर्वणीच आणि अवर्णीय सुख. शारीरिक, मानसिक स्वास्थ्याकरिता स्पा अत्यावश्यक आहेच. रिलॅक्स, निवांत, आणि तणाव मुक्त अनुभवायचं असेल तर स्पा योग्य पर्याय. थोडंस महाग आहे पण डॉक्टर कडे चकरा आणि औषध घेण्यापेक्षा कैक पटीने मस्त. आजकाल दगदग, रस्ते, खड्डे, कामाचा प्रचंड डोंगर, वैविध्यता, मल्टिटास्किंग आणि बऱ्याच अश्या गोष्टींमुळे स्पा तरणोपाय ठरतोय बऱ्याच वेळी. आज पर्यंत मी फक्त माणसांसाठी स्पा हे अनुभवलं होत, चार पायांच्या मित्रांसाठी पण स्पा हे ऐकलं होत / वाचलं होत, पण आज तर मी उडालेच, चारचाकी साठी पण स्पा, अहाहा. अप्रतिम आयडियाची कल्पना आहे. काय विचारता. आवडलं मला तो बोर्ड बघूनच. गाडी चकचकीत होत असेल पण खरंच गरज आहे का? संकल्पना काय, तुम्ही करताय काय? असो. ह्या नंतर अजून कुठल्या निर्जीव वस्तू ला स्पा लागणार आहे बघू यात. "नवनवीन कल्पना येति आणि हास्य फुलवुनी जाती".
बोलेवीण भाषा, शब्देविण संवादु
शतपाउली करण्यासाठी मी आणि माझी मैत्रीण आम्ही ठरवून खाली उतरलो, मस्त हवा चाखावी हा विचार होता. माझ्या मैत्रिणीला येण्याकरता थोडासा उशीर झाला तेव्हा अजून दोघी शतपाउली करता करता म्हणतात कश्या "आज अगदी हवा नाहीच ना? पान देखील हालत नाही आहे". त्यावर मी सहज बोलून गेले माझ्या स्टाईल मधे "आताच पानांचा फोन आला होता आणि ते म्हणाले आहेत कि काही क्षणात हवा चाखता येईल तुम्हाला". इतका मोठा हशा पिकाला म्हणून सांगते. माझ्याच शेजारणी मग काय म्हणतात कश्या "त्यांना सांग जरा १५ मिनिट नंतर हवा सुरु राहू द्या आमच्या चकरा होईस्तोवर", म्हटलं बरं, सांगते. आणि अगदी तस्सच झालं. त्यावर मला असं वाटलं आणि मी ते त्यांना बोलून दाखवलं कि पान फक्त आपल्यासाठी किंवा हवा देण्यासाठी हालचाल थोडीच करतात, त्यांना पण एकमेकांशी भेटायचं असतं, पाठीवरून हात फिरवायचा असतो, स्पर्श करायचा असतो, एकमेकांच्या सानिध्यात वेळ घालवायचा असतो, मग हवा असेल तरच ते पोचणार ना एकमेकांजवळ. ते देखील सजीव आहेत, त्यामुळे भावना आहेत आणि बरेच काही. पानांचा, वेलींचा, छोट्या फांद्यांचा तस्सा आज माझा झाला शब्देविण संवादु पानांशी, अनोखा, अद्वितीय असा.
रविवार, २७ मार्च, २०२२
शिस्त
मागे एकदा लिहिल्याप्रमाणे महाशिवरात्रीला आमच्या सोमेश्वरवाडी येथे भव्य दिव्य जत्रा भरते. त्या जत्रेत अनेक खेळ, विविध दुकानं आणि खाण्याची रेलचेल असते. काही दुकानदार तर फार दुरून प्रवास करून येतात ह्या जत्रेचा भाग होण्यासाठी. ज्यांना आकाशपाळणे किंवा अजून काही खेळ जोडायचे असतात ते एखाद दोन दिवस आधी येऊन त्याचे ठाण मांडतात, कारण ते आवश्यक आहे म्हणून. पण जे त्या दिवशी वस्तू, अथवा पदार्थ विकण्यासाठी येतात ते त्याच दिवशी पहाटे किंवा आदल्या दिवशी अपरात्री येत असतील. महाशिवरात्री दिवशी भक्तगण अगदी रात्री १२ पर्यंत येतात असं ऐकलं आहे. पण दुसऱ्या दिवशी लवकर ऑफिस ला निघालं कि अवाक व्हायला होतं, संपूर्ण रस्ता साफ. सगळी दुकानं गायब. महानगर पालिकेचे कर्मचारी साफसफाई करून मोकळे झाले असतात, किंवा त्यांचं काम संपतच आलं असतं. काय गती आहे, काय ऊर्जा आहे बघा, बाप रे बाप. दिवसभर विक्री करून देखील १२ नंतर सगळं गुंडाळून जिकडच्या तिकडे रवाना व्हायचं म्हणजे कमाल च आहे. कुठून येते एवढी ताकद आणि इच्छा. मरगळ हा शब्द नाहीच वाटतं त्यांच्या डिक्शनरी मधे. मला तर खूप भारी वाटलं, खूप काही शिकण्यासारखं आहे ह्या सर्वांनकडून खरंच. त्यांच्या इच्छा शक्तीला, सहन शक्तीला सलाम. त्यांना असाच धंदा नेहमी मिळो, पोटापाण्याची सोय नीट होवो हि प्रार्थना. "असे दुकानदार येति आणि स्मृती ठेवुनी जाती, शिस्त शिकवून जाती".
मातीचा सुगंध
प्रत्येक पाऊस हा पहिला पाऊसच असावा असं मला कायम वाटतं. उन्हाळा संपला आणि पावसाळा सुरु झाला / होणार आहे ह्याची चाहूल लागते जेव्हा काही तुरळक सरी येतात, दूर कुठेतरी पण त्या वेळी जो मातीचा अप्रतिम सुगंध येतो, त्याला शब्दात बांधणं म्हणजे गुन्हाच आहे, ठरेल. अगदी अवेळी असं झालं काही दिवसांपूर्वी. अचानक वातावरणात बदल जाणवला आणि पाय मोकळे करायचे म्हणून मी माझ्या केबिन च्या बाहेर पडले तर माझा आनंद गगनात मावेना. इतका अप्रतिम जगावेगळा सुगंध येत होता, थोडासा पाऊस पडला होता आणि तापलेल्या त्या मातीवर, त्यामुळे जो घमघमाट सुटला होता म्हणून सांगते, मला ताबडतोब माती खायचीच इच्छा झाली. इतकी तीव्र इच्छा झाली कि मी कसं मला आवरलं ते माझं मला ठाऊक. त्या वेळी माझ्या आजूबाजूला जीवशास्त्र आणि तत्सम अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी होते आणि त्यांनी एक शब्द उच्चारला पेट्रीकोर. तो मला इतका भावाला, आणि कदाचित माझ्या चेहेऱ्यावरचे भाव, माझी देहबोली ई. त्या विद्यार्थ्यांना इतकी आवडली कि त्यातली एक PhD करणारी विद्यार्थिनी सांगायला लागली कि तिचा मास्टर लेव्हल चा प्रोजेक्ट म्हणजे पेट्रीकोर तय्यार करणे असा होता. आणि ती १०० टक्के यशश्वी झाली होती. बरोबर संध्याकाळच्या वेळी जेव्हा बहुतांशी सगळे थकलेले असतात दिवसभर अभ्यास करून, प्रयोग करून, उभं राहून ई. तेव्हा मी त्या लॅब मधे माझ्या प्रोजेक्ट चे झाकण उघडायची. बास मग काय, इतका हुबेहूब सुगंध यायचा ओल्या मातीचा कि सगळे जण प्रसन्न होऊन जायचे आणि मला समाधान लाभायचे ते वेगळेच. पेट्रीकोर कसं तय्यार करतात ई. तिने मला सगळं समजावून सांगितलं. तेव्हा मला वाटलं असा रूम फ्रेशनर का नाही तय्यार करत कोणी? कित्ती नैसर्गिक आणि किती वेगळा सुगंध, त्यामुळे काय भन्नाट वातावरण निर्मिती होईल. आताशा नाही तरी फळं, भाज्या, आणि इतर गोष्टी क्रतू प्रमाणेच मिळतात असं नाहीच. अवेळी, अचानक असा अप्रतिम सुगंध चाखायला मिळालं तर किती मज्जा येईल, फक्त विचार करा मंडळी. एकंदरीत पेट्रीकोर ची प्रक्रिया, प्रोसेस मला मनापासून भावली. आणि ह्या विद्यार्थिनीला ते लॅब मधे तय्यार करण्याची संधी मिळाली, अहो भाग्य.
To know the scientific details, kindly visit following URLs:
https://www.acs.org/content/dam/acsorg/education/students/highschool/chemistryclubs/infographics/petrichor-the-smell-of-rain.pdf
https://www.bbc.com/news/science-environment-44904298
बायो डेटा vs सिव्ही
सातत्याने प्रत्येक नवीन कन्सेप्ट शिकवतांना किंवा शिकवणे सुरु करतांना / करण्याच्या आधी मी माझ्या विद्यार्थ्यांना त्या कन्सेप्ट चा उपयोग काय / कुठे / कधी आणि का केला जातो हे वैविध्य उदाहरणं देऊन समजावून सांगते. मलाच बरं वाटतं त्यामुळे. हायसं वाटतं कि मुलांना आधी पार्श्वभूमी समजली कि मग शिकवायला सुरवात. माझ्या काही विद्यार्थ्यांना मी एकदा विचारलं बायो आणि सीव्ही ह्यातला फरक काय? कारण हि दोन्ही वेगळी उदाहरणं आहेत, वेगळ्या कामासाठी वापरली जातात आणि ती संगणक संज्ञा वापरून वेगळ्या पद्धतीने उभी करावी लागतात. त्यामुळे म्हटलं ह्या सोप्या उदाहरणापासून सुरु करू या. आणि काय महद आश्चर्य मुलांनी हे शब्द ऐकले तर होते, पण त्यात फरक आहे हे त्यांना ठाऊक नव्हतं. मी उडालेच. म्हटलं अरे त्यांच्या नावावरून तर अंदाज बांधा, प्रयत्न करा, काही तरी सांगा, पण नाही. मग मी हलक्या फुलक्या शब्दात हिंट दिली तर मग सगळे पोपट बोलायला लागले. एक नोकरी मिळवण्यासाठी तर दुसरं छोकरी, हा काय तो फरक आहे. मोठा हशा पिकला वर्गात आणि मग चर्चा सुरु झाली दोन्ही तांत्रिक आणि बाकी बाबतीत देखील. तर असे माझे भन्नाट विद्यार्थी.
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...