मंगळवार, ४ मे, २०२१

Difference between Gossip and Gappa (Discussion / conversation / communication / chat / colloquy)

Gappa is primarily a popular Marathi word, which is so therapeutic. Felt like sharing few of my observation points between these two words.

Even though both words starts from alphabet "G" there is a huge difference and with extreme ends of positives and negatives. Positive and negative includes topics, people with whom you are conversing and people who are involved or topic of discussion etc. There is absolutely no limit to gappa as they may vary as the new interesting topic pops up. But gossip is restricted to a specific person or situation or observation wherein involved people talk consistently only about it using mostly wrong words. Gappa involved laughter and sharing past / great memories or experiences which in turn becomes memorable but gossip unnecessarily spread wrong or bad vibrations. Gappa come n go as they have increased the good hormones and hence used in remaining day's chores but gossip stays at the back of mind almost forever.

Also to gossip, involved people look for the absent guy or a girl and they kick start about him / her instantly. This is not the case with gappa. To gossip people work consistently to gather and observe wrong deeds of others at the same time to involve in gappa essentially all good points pop up about place, food, incidence and what not.

I was really surprised when I have observed many who are extremely highly qualified personalities who were a English medium students and primarily maharashtrians but still totally not aware of the difference between these two words.

Great.

A big thanks to all those because of whom I was able to come up with this write up. Wow.

सोमवार, ३ मे, २०२१

ढोबळी मिरची

माझी जुळी मुलं जेव्हा साधारण एखाद वर्षांची झाली तेव्हा एका दिवशी मी ह्यांना अल्टिमेटम दिला एकतर मला वेड्यांच्या इस्पितळात दाखल करा किंवा नोकरी करू द्या. हे असं म्हणायला अनेकविध कारणे होतीच, २४X७X ३६५ दिवस मी फक्त आणि फक्त दोघांच्या मागेच असायचे, माझीच होती दोघ पण जास्त झालं मला ते. मग माझी आई आली माझ्या मदतीसाठी, मला तारून नेण्यासाठी सरतेशेवटी. हाश $$$$. त्यानंतर मग मी नोकरी शोधण्यास सुरवात केली, आधी अर्ध वेळ, मग फक्त शनिवार-रविवार आणि मग पूर्णवेळ अशी मजल-दरमजल केली / झाली म्हणायला हरकत नाही.

माझ्या लहानपणी पासून आजतागायत मी एक सवय / शिस्त पाळली आहे जी म्हणजे मी घरातून बाहेर पडून परत घरी येईस्तोवर जे जे काय झालं ते पटापट घरी सांगायचं, आधी आई बाबांना आणि आता मुलांना सांगते, कानावर टाकणं महत्वाचं असत असं मला वाटत. मला माहित नाही का पण इव्हन माझ्या मुलांना पण ती सवय लागली आहे फार पूर्वी पासून, अगदी लहान असल्यापासून.

साधारण २.५-३ वर्षाची असतांना दोघांना शाळेत प्रवेश घेतला आणि तेव्हा पासून घरी आलं रे आलं कि सगळं आजीला प्रेम उतुजाईस्तोवर सांगितलं जायचं, कि आज काय काय झालं ते. जसं जसं टिचर शाळेत शिकवत असत तस्स थेट घरी येऊन सांगितलं जायचं आधी आजी ला मग मला संध्याकाळी मी घरी आल्यावर, दोघांची कॉम्पिटिशन असायची. त्यात एक दिवस पूर्णवेळ आजीचं डोकं खाऊन इतकं वेठीस आणलं कि दोन्ही पार्ट्या दमल्या. मी आल्यावर मग हुश्श झालं दोघांना. त्या खास दिवशी मुलं घरी आली आणि पोटतिडकीने कापशीकम हा शब्द, त्याचा अर्थ, तीच दिसणं, रंग, लठ्ठपणा  ई. करून दाखवण्याचा असफल प्रयन्त करत होती पण काही केल्या आजीला  कापशीकम काय हे कळत नव्हतच, दोन्ही पक्ष आडनेळ्या वयातले, देवा. मी घरी पोचल्यावर ढोबळी मिरची = कॅप्सिकम हे सांगितलं तेव्हा बापरे काय वेगळीच मज्जा आली, भन्नाट. आज लेकीने बेल-पेपर घालून आमलेट केलं तेव्हा पुन्हा एकदा हा किस्सा आठवला, तिला पुन्हा एकदा सांगित
ला  / narrate केला गेला, म्हटलं लिहावं.

तरारून आलेले मोड...

उद्याचं  किंवा पुढचं प्लांनिंग करणं आणि करत राहणं हा मनुष्य धर्मच आहे, मग ते पैश्याचं, गुंतवणुकीचं, स्वयंपाकाचं आणि तर निवृत्तीचं असो, विचार आणि कृती करत राहावी लागते. अर्थात मी काही वेगळी नाही, त्यामुळे काल रविवार, म्हटलं जरा आज मटकीची उसळ करावी, म्हणून सकाळी ती  भिजत घातली, संध्याकाळी घट्ट बांधून झाकून ठेवली आणि आज बघते तर काय तरारून मोड आलेले, "ना भूतो ना भविष्यती" असेच. सर्वप्रथम ते बघूनच प्रचंड आनंद झाला मला. मग ते मी स्वच्छ निवडले, मस्त फोडणीला घातले आणि थोडेसे च परतल्यावर मसाले घालून मग फस्त पण केले गरम गरम चव म्हणून. अहाहा काय दिवस सुरु झालाय म्हणून सांगते. उसळ फोडणी घालतांना सहज ध्यानात आलं कि अनेकदा मिसळ मधे जी मटकी घातली असते त्याला मोड आलेले नसतात,किंवा काही जणांकडे भिजलेली मटकीच फक्त शिजवतात, मग मोड येण्याची फेज आवश्यक आहे का? 

हे समजावून घेण्यासाठी मग थेट प्रोफेसर राधिका ह्यांना टेक्स्ट केलं, त्यांचा पट्टाकिनी फोन आला आणि त्यांनी काही मिनिटात आणि अतिशयच सोप्प्या भाषेत मला सगळी "लाईफ सायकल" मटकीची + प्रथिनांची + जीवनसत्त्वे ई. समजावली. मला हे सगळं गुगल-बाबा ला पण विचारता आलं असतं पण त्याने इतकं सोप्पं आणि सर्वगुणसंपन्न चौफेर उत्तर दिल नसत एका झटक्यात / एका वेबसाइट वर आणि माझा स्क्रीन टाइम वाढला असता ते वेगळंच. ह्या निमित्याने माझं थोडावेळ बोलणं झालं मॅडमशी.  

कुठल्याही पद्धतीने आणि स्थिती मधे मटकी सेवन केली तर त्याचे थोडे फार गुण मिळतात आपल्या शरीराला पण जर बेस्ट परिणाम साधायचे असतील तर भिजवणे अतिशय आवश्यक डायरेक्ट शिजवणे टाळावे, मोड आलेले थोडेसे शिजवून खाल्ले तर "सोन्याहून पिवळे". 

अगदी तस्सेच माणसाचे देखील असते नाही, सगळीच माणसं आहेत तशी उपयोगी असतातच पण जर आपण स्वतःला उत्तम संगतीत भिजवलं, आवडतील ते छंद जोपासत राहिले, उत्साहाचे मोड आणले म्हणजे मग त्या व्यक्तिमत्वाला सोन्याची झळाळी येतेच / येणारच, व्हिटामिन-सी भरपूर मिळणार नाती घट्ट होणार अजून. वय, व्यवसाय, वर्ण, ई. अनेक गोष्टी चा फरक पडत नाहीच मग, "जेथे जाल तेथे चमकाल" कारण सगळे लागणारे जिन्नस (प्रथिने, जीवनसत्वे ई)तुमच्या पेर्सोनॅलिटी मधे झळकत असतातच. "तरारून आलेल्या मटकीच्या" मोडांसारखे बहुउपयोगी राहा मित्रहो.

रविवार, २ मे, २०२१

शेंगोळे ...

आज रविवार, सुट्टीचा दिवस आणि म्हणजेच विविध पदार्थांची पर्वणी च जणू. त्यात आज आम्हा मुलांना "वन डिश मील" हवं होत, स्वयंपाक त्यामुळे कमी होता आणि मग काय सोडते का मी, ताबडतोब वेळखाऊ शेंगोळे तय्यार केले. 

शेंगोळे (गोड) हे माझ्या आई-बाबांकडे गणपती च्या नेवेद्याला वर्षातून फक्त एकदा करत असत, गणपती उठायच्या दिवशी. त्याही मुळे असेल कदाचित, मला भयानक च आवडतात शेंगोळे, कारण रेअरली होत असतं त्यामुळे. असो. माझी हि आवड मी माझ्या घरी पण जपली आणि माझी मुलं देखील ह्या शेंगोळ्यांची माझ्या पेक्षा मोठी फॅन आहेत, सतत माझ्या मागे लागतात कर म्हणून. आज मुहूर्त लागला, केले आणि फस्त झाले बघता बघता एका मिनिटात. 

तेव्हा वेद म्हणतो कसा "मम्मा तुला आठवत का ग, एकदा आमच्या शाळेत सगळ्यांना तुमच्या गावाकडचे / कुटुंबातले रेअर गोड पदार्थ करून आणायला सांगितले होते, आणि तू आम्हाला शेंगोळे आणि वार्णिकाला प्रचंड आवडत म्हणून कलाकंद करून दिला होता. हे दोन्ही पदार्थ सगळ्यांना थोडे थोडे चव म्हणून येतील असे द्यायचे होते, आणि तू गोड चिकट हाताला लागू नये म्हणून "श्री. सत्यनारायण" प्रसादाला वापरतात त्या छोटेखानी कागदाच्या वाट्या पण सोबत दिल्या होत्या, बाप रे, सकाळी उठून कधी केलंस सगळं?" ई. मी तर विसरले होते हे सगळे पण वेदनी आठवण करून दिल्यावर आलंच डोळ्यात पाणी थेंब भर आणि फारच भन्नाट वाटलं. कारण असं कि वेद पुढे म्हणाला कि मम्मा आम्ही दोघांनी आणि अजून एखाद्या मित्रांनी गुलाबजामून करून आणले होते बास, बाकी सगळ्यांनी विकतचंच आणलं होत. कोणालाही शेंगोळे माहित नव्हतं, आम्ही खूप प्रयन्तपूर्वक समजावून सांगितलं, इव्हन टिचर ना पण माहित नव्हतं.  काहीतरी पेरलं आहे मी थोडंस ह्याची खात्री झाली आणि आता पुन्हा जेव्हा जेव्हा मी शेंगोळे हा शब्द वापरणार तेव्हा तेव्हा मला आता हे आठवणार च. 

फुल्ल vs empty...

माझ्या अगदी लहानपणी पासून आम्ही जेव्हा जेव्हा माझ्या बाबांच्या जीप मधून बाहेर जायचो तेव्हा तेव्हा न चुकता ते मला संपूर्ण रस्ताभर विविध माहिती द्यायचे. रस्त्याचे नाव काय, आपण कुठे चाललो आहोत, ठळक ठिकाण (माईल स्टोन्स), रस्त्याच्या ह्या बाजूला काय आहे, त्या बाजूला काय आहे, प्रसिद्ध काही दुकाने आहेत का ई. आणि बरेच काही. एक वेगळीच पर्वणी होती / असायची ती. भन्नाट अनुभव. अर्थात मागे वळून वळून स्कूटर चालवतांना पण ते सांगायचेच पण गाडीत कसं मी त्यांच्या एकतर मांडीवर किंवा शेजारी बसलेले असायचे त्यामुळे जास्त एफ्फेक्टिव्ह होत असे माहितीपूर्ण संवाद. थोडी मोठी झाल्यावर मी एकदा विचारलेच मी त्यांना शेवटी, "तुम्ही सतत न कंटाळता, न चुकता मला सगळ्या रस्त्यांची माहिती का देता इतके वर्ष झाले?", तर म्हणतात कसे, "अगं तू मोठी झालीस आणि स्वतः गाडी चालवायला लागली कि तुला तेव्हा जड जाणार नाही, सगळं माहिती आणि पाठ असेल". दूरदृष्टी, अहाहा.

अर्थात हि सवय माझ्या रक्तात इतकी भिनली होती कि जेव्हा मी आई झाले, आणि मुलांबरोबर गाडी चालवत इकडे तिकडे जात असे तेव्हा मी पण अस्सच न चुकता करत होते कित्येक वर्ष. प्रत्येक रस्त्यावरच्या खुणा, अंतर, दुकाने सगळं म्हणजे सगळं सांगत होते मुलांना. मला तर इतकी सवय झाली होती कि जेव्हा मी एकटी गाडी चालवत असे, मुलं शाळेत किंवा अजून कुठे असतील तेव्हा देखील माझी बडबड सुरूच असायची, मग थोड्यावेळाने माझं मलाच जाणवायचं कि आपण एकटे आहोत आणि मोठा हशा पिकायचा. मी स्वतःच हसायचे भरपूर.

एकदा आम्ही चौघे जण कुठे तरी जात होतो आणि माझी मुलं सिनियर के जी मधे होते, म्हणजे पूर्ण झालं होत त्यांचं आणि पाहिलीत आता ऍडमिशन होणार होती, उन्हाळ्याची सुट्टी लागली होती. जशीही आमची गाडी त्यांच्या शाळेजवळ आली तसं मी विचारलं कि आपण कुठे आलो आहोत? तर पट्टाकिनी वेद म्हणतो कसा "मम्मा, आमची शाळा, आमटी शाळा". मी पूर्णपणे बुचकळ्यात पडले, "आमटी शाळा" म्हणजे काय? तर म्हणतो कसा, काय मम्मा फुल्ल आणि आमटी, तुला नाही माहिती, आम्हाला शिकवलं आहे मॅडमनी, व्वा, आज हि इतक्या वर्षानंतर हे लिहितांना देखील मी भरपूर हासले, माझी मी आणि मुलांना सांगून पुन्हा एकदा. देवा त्याला एम्प्टी शाळा म्हणायची होती, बिचारा महाराष्ट्रीयन आहे, आमटी नेहेमी खातो, त्यामुळे शब्दांची भलतीच गडबड झाली. असो, पोटभर हसायला तर मिळाले ना. म्हटलं आज "हास्य दिन" आहे, लिहावं.... मंडळी, दररोज खुद्कन किंवा पोटभर हसा आजपासून, आपले असंख्य उपभोगलेले आधीचे प्रसंग आठवून...  promise? pakka promise ok...

To listen to this story in my voice pl click on: https://youtu.be/C0kxRk1Ctgg

For more such stories find me also on Twitter and Facebook.


शनिवार, १ मे, २०२१

पशुवैद्य...

आज एका हत्तीचा फोटो आला आहे इंग्लिश वर्तमानपत्रात आणि त्यात त्या गोंडस हत्तीला लागलंय, पायाला पट्टी बांधली आहे आणि तो स्पेशल हत्तीच्या दवाखान्यातून बाहेर पडतो आहे. तो फोटो बघून काही गोष्टी आठवल्या, माझे माझ्या मुलांबरोबर झालेले संवाद आठवले आणि म्हटलं लिहावं. 

माझ्या मुलांची एक वर्ग मैत्रीण आहे तिला "पशुवैद्य/जनावरांचं डॉक्टर" व्हायचं आहे, जे माझ्या दृष्टीने एक आव्हान आहे. कारणं बरीच आहेत. माणसांचं डॉक्टर होणं देखील आव्हानात्मक असतं कारण ढगाएवढा अभ्यास असतो आणि प्रत्येक येणाऱ्या पेशंट बरोबर नव्याने कदाचित शिकावं लागत, पण माणसं सांगू तरी शकतात काय झालाय ते आणि डॉक्टर स्वतः माणूसच असल्यामुळे त्याला सगळं समजत पण. माणसाच्या डोक्यात आणि शरीरात काय काय होतंय ह्याचा ठोकताळा बांधणं जमू शकत एक वेळेस पण ह्या मुक्या प्राण्यांचं काय. त्यांच्या शरीरयष्टी बद्दल तर शिकावच लागणार शिवाय त्यांच्या मानसिकते बद्दल, जे भलं मोठं आव्हान आहे आणि प्रत्येक प्राणी आणि त्याची व्याधी / त्याच प्रमाण हे सगळं गृहीत धरून, त्यांच्या कलानी घेऊन मग उपचार करायचे. 

त्यानंतर तो जर हत्ती सारखा जंगलात राहणारा प्राणी असेल, घरी नाही तर समजणार कसं कि 

१. तो बरा झालाय आणि 

२. तोच आला होता आधी उपचाराकरता ? 

ओह, मला फारच प्रश्न पडले आहेत. पण माझ्या दृष्टीने हा एक मेडिटेटिव्ह कोर्से आणि प्रोफेशन आहे.  झपाटलेला च हवा ह्या क्षेत्रात जाण्याकरता, माझ्या दृष्टीने. 

हे सगळं जेव्हा मी माझ्या लेकीशी बोलत होते / डिसकस करत होते, तेव्हा तिने इतक्या अप्रतिम गोष्टी सांगितल्या मला कि जगात वेगवेगळ्या ठिकाणी कित्ती वेगवेगळे अवलिया आहेत ह्या क्षेत्रात मनापासून काम करणारे. त्यावर पुन्हा कधीतरी नक्की लिहिणार कारण ते एका लेखात मावण्यासारखं नाही ना.

नवीन दिवस आणि बारावी ...

 सध्या बारावीत असलेल्या सर्व विद्यार्थी प्रतिक्षेत आहेत कि कधी त्यांच्या परीक्षेचं टाइम टेबल जाहिर होईल एकदाच. अर्थात विद्यार्थ्यांप्रमाणे त्यांचे पालक आणि शिक्षक सुद्धा वाट बघत आहेत, पण विदयार्थांचं थोडं वेगळं आहे. 

कसं ते सांगते, त्यांची संपूर्ण बारावी ऑनलाईन पद्धतीने झाली, सतत घरी आणि सतत तोच तोच अभ्यास करून आणि त्या संगणकावर स्क्रीन समोर वैताग येणार हे साहजिक आहे. त्यात भरीस भर म्हणजे वर्तमानपत्रात किंवा टीव्ही वर मोठ्या मोठ्या क्लास चे लोक येऊन सतत अभ्यास करा, अजून प्रश्न पत्रिका सोडवा, जोवर टाइम टेबल तुम्हाला मिळत नाही तो वर अभ्यास चालूच ठेवा, घड्याळ लावून पेपर सोडवा, ई. सूचना देत आहेत. 

नाण्याची दुसरी बाजू अशी कि एकदाची परीक्षा होऊन गेली कि बरं होईल, विद्यार्थी मोकळा श्वास तरी घेतील. थोडं अवघड आहेच सतत टांगती तलवार सांभाळणं. थोडी उसंत घ्या असं हि सांगायला काही हरकत नाही पालकांनी किंवा शाळेनी किंवा ह्या क्लास वाल्यांनी. फक्त अभ्यासाची आलेली पकड सुटता काम नये. थोडा ब्रेक घेतला आणि घेतातच मुलं बहुतांशी, कि अजून जोमाने अभ्यास व्हायला हवा. 

असो, जरासं वेगळं आहे हे सगळं. एकीकडे विद्यार्थ्यांचं बरोबर आहे तर दुसरीकडे बारावी नामक हवा आहे. "पासिंग क्लाऊड" आहे हा लवकरच सगळं सुरळीत होईलच. बॅलन्स साधा मित्रहो, थोडं चिल करा आणि थोडा अभ्यास, थोडं पुस्तकातून वाचा आणि थोडं संगणकावर किंवा मोबाइल वर ऐका, बघण्याला उपाय आहेत बरेच. शेवटी प्रत्येकाची ध्येय वेगळी असतात त्यामुळे विध्यार्थ्यांना रुचेल पचेल ते करत राहावं, "प्रयोगातून विज्ञान", आणि इतक्यात कंटाळा, बोर होणं, मरगळ येणं ई. परवडण्यासारखं नाहीच आहे, ह्या नवीन संधीचा उलट फायदा घ्या. 

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...