मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०२३

वाटेवरची पहिली पायरी

टेकनो स्याव्ही "तो", ह्या सदरा अंतर्गत मी लिहिल्या प्रमाणे मला अनेक वर्ष दिशा दाखवण्याचं कार्य त्याने सातत्याने केलं होतं. सर्व व्याधींचा किंवा प्रतिबंधात्मक रामबाण ईलाज पुढ्यात मांडला होता, पण मी त्या कडे काना डोळा करत आले, किंबहुना हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही कि किंचित स्वतःला शहाणी समजत आले. असो. 

पण आता सर्वप्रथम म्हणजे मागचे सगळे अनावश्यक विचार बाजूला सारून हे स्तोत्र पठण नित्यनेमाने करायचंच हे मनाशी पक्के केले आहे. 

  • लहानपणापासून बघितलं आणि ऐकलं आहे कि त्या खास चार दिवसात देवाशी निगडित कुठलीही सेवा करायची नाही, पण माझ्या लेकीमुळे मला हे पटलं आहे कि माझ्या खोलीत बसून, हात जोडून स्तोत्र म्हणायला काय हरकत आहे, त्याचं नामस्मरण कधीही, कोणीही, कुठेही करू शकतो, नाही का? 
  • एक वेळ ठरवली आहे, दिवेलागणीची
  • सगळी तांत्रिक साधनं बंद ठेऊन, बाजूला सारून नित्यक्रम सुरु आहे 
  • मोठ्याने म्हणणं सुरु आहे, प्राधान्य दिलं आहे वाचण्या किंवा ऐकण्या ऐवजी 
  • हवी तशी एकाग्रता एकवटता येत नाही आहे, त्यामुळे आधी रामनाम म्हणायला सुरवात केली आहे ("मन उधाण वाऱ्याचे...") 

आज साधारण एक आठवडा झाला पठण सुरु करून. तब्बेतीत, एकंदरीत शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक ई. अनेक बदल घडतील, दिसून येतील, भासतील, अनुभवता येईल लवकरच हि पक्की खात्री. जशी जशी मला सूचना मिळेल तसे तसे मी येथे व्यक्त होईनच, तो वर सगळे जण जमेल तसे, जमेल तेवढे, जमेल ते, आवडेल ते नित्यक्रम सुरु ठेवा, वैज्ञानिक दृष्ट्या औषधं म्हणून पठण करा, कुठलेही किंतु-परंतु मनात न ठेवता, कुठलीही अपेक्षा न बाळगता. किंबहुना नित्यनेमाने पठण करत राहिलात तर कदाचित अपेक्षा हा शब्द कधी विसरला जाईल हे लक्षात देखील येणार नाही. 

टेकनो स्याव्ही "तो": https://drpreetimulay.blogspot.com/2023/02/blog-post.html

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०२३

आवडती गोष्ट

मी फक्त असं ऐकलं आहे आणि बरीच मंडळी करतांना दिसतात देखील, ते असं कि तुमच्या जवळपासचं व्यक्ती गेल्यावर त्याचा आवडता पदार्थ वर्ज करायचा एक वर्ष, त्यांच्या स्मरणा प्रित्यर्थ. ह्या मागचे कारण समजायला मी अजून कदाचित लहान आहे किंवा कधी खोलात शिरले नाहीच. असो. मला एक प्रकर्षाने जाणवलं ते असं कि आपल्या अवतीभोवती असंख्य मंडळी सातत्याने वावरत असतात. प्रत्येकाच्या काहींना काही सवयी असतात. त्यातल्या काही आपल्या आवडीच्या असतात आणि काही नावडीच्या. अर्थात हे आपल्या सर्वानांच लागू पडतं म्हणावं. कदाचित माझ्या काही सवयी इतरांना भावल्या नसतील किंवा मला काही इतरांच्या सवयी खटकत असतील. बहुतांशी प्रत्येकजण इतरांच्या खटकणाऱ्या सवयींबद्दल  सुतवाच्य करतंच, नेहेमीच. सुतवाच्य करून करून समोरचा दमतो पण बऱ्याचदा त्या अंगवळणी पडलेल्या सवयी काही केल्या जात नाहीतच. 

सर्वप्रथम माझ्या मनाला शिवून गेलेला विचार असा होता कि खाद्य पदार्थच का? एखादी सवय सोडली वर्षभर तर? करून बघायला काय हरकत आहे, कदाचित फक्त त्या व्यक्तीला नाही तर बऱ्याच इतर जणांना परमोच्च आनंद होईल, फायदा होईल. 

कोणी गेल्यानंतरच का सवयी बदलायच्या, हयातीत असतांना का नाही? जर कोणी पोट तिडकीने सांगतंय तर प्रयोग म्हणून करून बघायला काय हरकत आहे, काही दिवस करा, नाही जमलं तर चालू ठेवा, २-३ आठवड्यात जमेल देखील, अशक्य काहीच नाही ह्या जगात,  नाही का? आणि कोणी जर काही सांगत असेल तर खरंच ते वैताग देणारं असेल म्हणूनच ना? उगाचच कोणी तुमच्या मागे लागणार नाहीच. 

दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतःसाठी करून बघा, खूप लाभ होईल, दृश्य अदृश्य अश्या स्वरूपाचा. प्रत्यक्षदर्शींनी शिकायला मिळेल आणि असाच आनंद द्विगुणित होत राहील.  

Steps of ladder

It all started formally when I was 15. One school going kid suffering with a unique kind and sort of obesity required help in his homework. Followed by a very smart kid's requirement again related to his homework and the journey continued till date.

The next stepping stone was handling CA foundation batch, then aspiring CA's batch, very senior to me and finally authored a simple to understand booklet for them and upcoming batches. There was a course on how technology will be useful to aspiring CAs.


Next step in the ladder was lecturer at polytechnic college, senior lecturer at engineering college with graduate degree.


Stood first in all India entrance for M.Tech, completed with flying colors, assistant professor at engineering college were achieved.


Moved to WSU, MI, USA for PhD and worked as GTA. During this time experienced conference paper writing and presenting at national and international levels.


Then Scopus indexed journal papers, SCI, ESCI journal papers (few of them only), book chapters etc.


Associate Professor, PhD guide, Microsoft Grants, Sakal Foundation grants (tiny in size and scale) etc.


In-charge academics and platinum opportunity to be a means to establish a new engineering college with the help from all friends at the existing college


Professor, international industry collaboration grant / award and international co-guides too.


The journey which started at the tiny town with whole lot of Marathi speaking people around, without any touch of English, internationalization, research, paper writing etc. reached till here with baby steps and many potholes too indirectly directing further always. Thanks to one and all who were with me on the ride as a part of this journey. Lets see what next is waiting to experience.




ती वेळ

जास्त मागे जात नाही कारण तितक्या मागचं मी अनुभवलं नाही. एक पिढी फक्त मागे, म्हणजे माझ्या आईची.  आज मला एक गुपीत नाही तर रहस्य म्हणा नाहीतर अजून काही. मी लहान होते, आईच्या पाठिमागे पालुपद असे सतत, आणि तिच्या अनेक नित्यक्रमांपैकी एक म्हणजे तिन्ही सांजेला देवापाशी, तुळशीपाशी दिवा लावायचा, शुभंकरोती आणि इतर स्तोत्रे म्हणायची. मी फक्त हे टिपत होते, अनुभवत होते आणि हे असं का करतात? ह्याच वेळी का करतात? ई. च्या फंदात कधीच पडले नाही. नकळत सर्व स्तोत्रे मुखोद्गत झाली आणि मी तिच्या संगतीने म्हणू लागले इतकंच. आज अचानक का कुणास ठाऊक पण काही तरी जाणीव झाली, इतक्या वर्षांनी, ध्यानी-मनी नसतांना, कुठलाही प्रकर्षाने विचार करत नसतांना. मोठी झाले तशी तिन्ही सांजेची वेळ महत्वाची का असते हे शास्त्रोक्त कारण समजलं, तुळशीपाशी दिवा का लावायचा, घरच्या स्त्रीने / मुलीने हे सर्व का करायचं ई. सगळंच हळूहळू समजलं. पण आज काही वेगळं उभं ठाकलं माझ्या पुढ्यात आणि म्हणून हि अनुकथा. 

सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर चौकोनी कुटुंब, एकत्र परिवार, त्यातले मुलं शाळकरी आणि बाकी इतर मंडळी कचेरीत जाणारी अशी. सगळेच संध्याकाळी दमून भागून येणार, मग दूध, चहा, पाणी, किंचित खाणं / अल्पोपहार ई. झालं कि मग आईच्या जिवाला किंचित थोड्यावेळाची स्थिरता, हात मोकळा. सगळ्यांची पोटं भरली असली कि, घरची महत्वाची कामं आटोपली असली कि, मोठी मंडळी पाय मोकळे करायला देवळात नाही तर फिरायला गेले, मुलं खेळायला कि मग शांत चित्ताने "त्याचं" नामस्मरण. काही क्षण देवघरासमोर मनःपूर्वक बसायला मिळणार, मानसपूजा / देवपूजा ई. मुळे मनःस्वास्थ्य तर लाभणाराच शिवाय वेगळं बळ सर्वांना एकत्र गरमागरम जेवण करून वाढायला. ह्या छोट्याश्या कारणामुळे कदाचित "ती वेळ" नेमण्यात आली होती घरच्या मुली / स्त्रियांसाठी दिवेलावणीची, स्तोत्र पठाणांची असं मला वाटतं. 

ह्या विचारानंतर लगेच अजून काही सह-विचार देखील सुचले. त्यात काकड आरतीची वेळ, माध्यानाची वेळ देखील अपूर्व पर्वणीची का हे उमगलं. तेव्हा देखील आई थोडीशी मोकळी असते. काकड आरतीच्या वेळी घरचे साखर झोपेत असतात, माध्यानाला शाळेत किंवा कचेरीत, पुन्हा "त्याच्या" कडे मनःपूर्वक लक्ष देऊन खूप काही साधलं जातं म्हणून. अर्थात ह्या दोन सर्वोत्कृष्ट वेळा सर्वांसाठीच महद फायदेशीर आहेत स्वतःशी, "त्याच्याशी" संवाद साधण्यासाठी, एकरूप होण्यासाठी, मानसपूजा करण्यासाठी. 

आपले शास्त्र आणि त्यात सुचवलेले अगदी विज्ञानाला धरून तर आहेच पण सर्वांच्या भुमिकेला अनुसरून देखील. 

आमच्या पिढीपासून बहुतांशी सर्वच मुली, स्त्रिया, आया घराबाहेर देखील आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत सहजी. अश्या वर्गाने मग जमेल तेव्हा, जमेल तेवढे, आवडीनुसार हे सगळं किंवा काही अंशी करण्याचा प्रयत्न जरूर करावा, नाहीतर हक्काची निवृत्तीनंतर ची वेळ आहेच तेव्हा करा. ज्या भारतीय मुली / स्त्रिया परदेशी आपला ठसा उमटवत आहेत तेथे वर्षातून १-२ महिने रजा घ्यायची सोय आहे, अश्या वेळी किंवा शनिवार रविवारी, सुट्टीच्या दिवशी काही मिनिटे निश्चित करून स्वानुभव नक्की घ्यावा. ह्या सगळ्याला कदाचित तुम्ही "मी टाईम" अशी नाविन्यपूर्ण संज्ञा देऊ शकता. काहीही चालेल, देव म्हणून नाही तर उत्कृष्ट लहरी निर्माण करणारे साधन म्हणून, श्वासोश्वास वेगळ्या लयींनी होतो म्हणून, किंवा अजून काही छोटासा आधुनिकतेचा साज चढवून बघितलं, आजमावलं तरी देखील चालेल. "ती वेळ" ह्या बाबतीत तुमचे अनुभव ऐकण्यास मी नक्कीच उत्सुक आहेच. कळवा नक्की. स्वतःचीच वेगळी ओळख नक्की होईल आणि पटेल. 

रविवार, ५ फेब्रुवारी, २०२३

You are important

There is an article in the local daily Sakal narrating the annual gathering event at one of the schools in Pune. The annual event of school definitely includes parents as well, and hence the chief guest directed his speech accordingly. BTW, the chief guest here is the famous Marathi actor. The chief guest at that event said or used the following statements in his speech: "Today’s generation of kids is smarter than their age." "Let them do what they want to do."


My take on this:
-Today’s parents will never force their child to pursue any specific course.
-Even if parents force kid will not listen
-Due to Google University, unnecessary knowledge is available at the finger tips and hence kids may not know actually / frankly-speaking what to do or what they want
-Due to availability of so many courses, avenues and opportunities these days, kids may need help to choose the field and direction
-And most importantly, this chief guest should add something more to his speech, which, according to me, is more significant: "Every occupation is important; society and the world need doctors of all kinds, engineers from different domains, CAs, CSs, chefs, and the list is endless." Most crucial point is even if with lots of thoughts the course is chosen, what is the guarantee that once the course will start the kid will definitely like it? Once the graduation is complete the child will get to work with all friends, like minded people only and always? So if this is the reality, then why waste unnecessary time and energy until one gets confused while choosing the course? Individuals may check the distance, money involved and little about inclination regarding course, just go for it, accept all the challenges, get habituated to work with everyone around with happiness, learn to live with all sorts of people, rather we do it every time. Not only the course, but every project as a part of that course is important. Remove the word "confusion" from the dictionary. Keep doing, you will find your own way, niche way. Once an individual graduates, starts earning or while studying too you may keep your interest alive, who stopped you from doing that?. Rather, what are your likes? You will come to know that only when you keep exploring with baby steps, right? So just go with the flow and always enjoy; spread the happiness to make your world joyful.

प्रत्येक काम मोलाचे

आज रविवार, माझा हक्काचा सुट्टीचा दिवस. मी ह्या दिवशी पोटभर मराठी वर्तमानपत्र वाचते. अनेक बातम्या अत्यानंद देऊन जातात, काही नवीन भर घालतात ज्ञानात, आणि काही माझ्या हातून काही नवीन लिहून घेतात. तर आजच्या वर्तमानपत्रात एक बातमी आहे. एका पुण्यातल्या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन होते, त्यात प्रमुख पाहुणे म्हणून एक दिग्गज अभिनेते बोलावले होते, बाकी मान्यवरांसोबत. ह्या प्रमुख पाहुण्याने त्यांच्या भाषणात जे सांगितलं ते बातमी म्हणून छापून आलंय. वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे मुलांसोबत पालक देखील आलेच प्रेक्षक म्हणून. मान्यवर म्हणतात कि सध्याची मुलं हुशार आहेत, वयापेक्षा जास्त समज आहे, खूप पराकोटीचं ज्ञान आणि माहिती गुगल विद्यापीठामुळे उपलब्ध आहे त्यामुळे त्यांना हवं ते क्षेत्र निवडू द्या. 

माझ्यामते एक तर सध्याचे आधुनिक जाणकार पालक कुठलाही अडथळा आणणार नाहीत किंवा जोर जबरदस्ती करणार नाहीत हे निश्चित, मुलांची अभ्यासाची दिशा ठरवतांना. दुसरं म्हणजे मुलं देखील ऐकणार नाहीतच. तिसरं म्हणजे इतकी जास्त, नको तितकी माहिती उपलब्ध असल्यामुळे उलटं मुलं सैरभैर होतात कधी कधी. कितीही हि पिढी वयापेक्षा निर्णय घेतांना दिसली तरी बरीच जणं गोंधळलेली देखील असतात. इतके जास्त प्रकार अभ्यासाचे उपलब्ध आहेत त्यामुळे देखील असेल. 

सर्वात महत्वाचं म्हणजे त्या दिग्गजाने / मान्यवराने माझ्या दृष्टीने अजून एक वाक्य नक्की बोलावे त्यांच्या भाषणात कि "प्रत्येक अभ्यासक्रम महत्वाचा आहे, सर्व पद्धतीचे व्यावसायिक हवेच आहेत जगात. खूप जास्त विचार करू नका. कितीही विचारपूर्वक सगळं निवडलं आणि प्रत्यक्ष अभ्यासक्रम सुरु झाल्यावर असं वाटलं नाही आवडत आहे तर?, असं होऊ शकतं. तेव्हा दोन पर्याय असतात, एक तर तो अभ्यासक्रम सोडता आला तर सोडा आणि दुसरा सुरु करा. पण मग हे कितीदा करणार? काही अभ्यासक्रम सोडता येत नाही, एकदा जीवशात्र, वैद्यकीय अभ्यास प्रवेश घेतला कि पूर्णत्वाला न्यावाच लागतो. त्या पेक्षा गोडी निर्माण करा. पुन्हा एकदा आवर्जून सांगते प्रत्येक व्यावसायिक महत्वाचा आहे. पुढे काय मांडलय हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे पुढे व्हा, मित्र तय्यार करा, आनंदाने अभ्यास करा, एकत्र गृहपाठ करा, प्रोजेक्ट्स करा, करत राहा, खेळा ई. म्हणजे आवड निर्माण होईल आणि टिकून राहिल. जे आपल्याला आवडतं सध्या ते देखील आपण कधीतरी पहिल्यांदाच केलं असतं, चाखलं असतं नाही का? मग?"

बरं असं गृहीत धरा काही क्षण कि तुम्हाला तुमच्या आवडीनुसार अभ्यासक्रम मिळाला, कोण खात्री देऊ शकेल का कि आयुष्यभर तेच तुम्हाला करायला मिळेल? तुम्हाला आवडणारी लोकंच तुमच्या अवतीभोवती सातत्याने वावरतील, काम करतील? नाही ना? मग? खरं तर त्या मान्यवराने ह्या अश्या संदर्भात त्यांचे भाषण खरं तर सुरु करायला हवे, किंबहुना त्याच नाही प्रत्येक मान्यवराने देखील. माणसांशी, कामाशी, आजूबाजूच्यांशी, घटनांशी, आव्हानांशी जुळवून घेत पुढे जायचं. बास, प्रत्येकजण हेच करतो, करावंच लागतं, पर्याय नाही, मग हे हसत-खेळत स्वीकारा, मान्य करा आणि प्रत्येक कामाची सुरवात करा. कित्ती सोप्पं आहे ना. 

प्रत्येकाला हो म्हणा, हा कानमंत्र, रामबाण इलाज आहे हा हे लक्षात तर ठेवाच पण उपयोग करा, कृतीत आणा आणि बघा कशी जादू घडते ते.  जवळपासचा अभ्यासक्रम आहे तर तो निवडा, पैशाची सोय बघा आणि होऊन जाऊ ह्या. एकदा पदवी प्राप्त झाली, नोकरी छानशी सुरु झाली कि हळूहळू करा कि तुम्हाला आवडेल ते, चाचपडून बघत राहा काय काय आवडतंय ते आणि सातत्याने कार्यरत राहा.     

शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३

टेकनो स्याव्ही "तो"

मला समजायला लागल्यापासून मी माझ्या आईचा एक नित्यक्रम बघितला आणि अनुभवाला आहे. नित्यनियमाने ती सगळी स्तोत्र दोनदा तरी म्हणायची. सुट्टीच्या दिवशी दोन्ही वेळा कानावर पडायची. आणि दररोज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळा निश्चितच. बाकी सगळी स्तोत्र छोटेखानी अशी होती पण श्री. विष्णू सहस्त्रनाम हे मात्र मोठं आणि किंचित अवघड. इतकी वर्ष सातत्याने कानावर पडल्यामुळे आत्मसात झालं, कधी  ते आपोआप तोंडपाठ झालं हे कळलं देखील नाही. इतकं मोठं प्रात्यक्षिक माझ्या समोर होत होतं बरीच वर्ष. 

त्या नंतर मी वसतिगृहात राहत होते पण तरी देखील तोंडपाठ असल्यामुळे सहज श्री. विष्णू सहस्त्रनाम  म्हटलं जायचं. 

अमेरिकेत देखील एक श्री. सत्यसाई बाबांची भक्त माझी मैत्रीण, ती देखील दर गुरुवारी श्री. विष्णू सहस्त्रनाम पठण ठेवायची तिच्या घरी, मी आवर्जून जायचे म्हणायला. 

पुण्याला आल्यावर अधेमधे आणि ४-५ श्रावण शुक्रवारी म्हटलं जायचं माझ्या घरी सामूहिकरीत्या श्री. विष्णू सहस्त्रनाम

त्या नंतर अचानक एका सोशल मिडिया संघाचा मी भाग झाले, आणि दर एकादशीला श्री. विष्णू सहस्त्रनामचं पठण सुरु झालं, कोणाच्या तरी कोणाच्या घरी, नाहीतर मध्यंतरी ऑनलाईन माध्यमातून. 

परवाच अचानक एक व्हिडिओ आला माझ्या पुढ्यात नकळत. त्यात एका सुवर्णपदक विजेत्या अभियंत्याने संशोधन करून प्राचीन ग्रंथात नमूद केलेले अनेक संदर्भ दिले श्री. विष्णू सहस्त्रनाम ह्या स्तोत्राबद्दल आणि त्याचा प्रकृती स्वास्थ्याशी असलेल्या निगडीत संबंध दर्शवण्यासाठी. हजारो वर्षांपासून वैद्य श्री. विष्णू सहस्त्रनाम हे प्रिस्क्रिप्शन / महत्वाची औषध योजना म्हणून लिहून देत होते म्हणे. असंख्य संदर्भ त्यांनी वाचून दाखवले, समजावून सांगितले आणि वैविध्य घडलेले प्रसंग, आलेले अनुभव कथन केले. खुपश्या प्रकृतीच्या तक्रारींच निवारण करण्याची प्रचंड ताकद ह्या स्तोत्रात आहे, अगदी रामबाण ईलाज जसा. 

बघा म्हणजे "त्याने" मला अनेक वर्ष प्रात्यक्षिक करून दाखवलं, सामूहिक पठण करण्यासाठी वेगवेगळे संघ निर्माण करून दिले ऑफलाईन / ऑनलाईन पद्धतीने, ऑडिओ ऐकवला आणि सरते शेवटी संशोधन आणि व्हिडिओ करण्याची सद्बुद्धी दिली, केवळ माझ्यासाठी, मला आठवण करून देण्यासाठी. "काखेत कळसा आणि गावाला वळसा" अशी गत झाली माझी. मी "पिलर्स तो पोल्स" सारखी ह्या वैद्यकिय तज्ज्ञाकडून त्या माहीर डॉक्टर कडे ४ वर्ष सलग पळते आहे, फेऱ्या मारते आहे, भरमसाठ औषधं घेते आहे, पथ्य पाळते आहे, व्यायाम करते आहे आणि अर्थात ह्या सर्वांची गोळाबेरीज म्हणजे गूण येतोय पण बरं होणं किंवा पूर्णपणे बाहेर पडणं / नेहेमी करता ठणठणीत वाटणं होतं नाही आहे अजून. अजून कित्ती "टेकनो स्याव्ही" व्हावं "त्याने" केवळ माझ्यासाठी. माझ्यासाठी कित्ती प्रकारे माझ्या पुढ्यात उभं केलं सोल्युशन / तरणोपाय / रामबाण ईलाज. आणि मी मात्र वेडी, मला ते कधीच ध्यानात आलं नाहीच. खूप उशिरा प्रकाश पडला. इतकी करोडो "त्याची" लेकरं जगभर पण माझ्या कडचं लक्ष त्याने ढळू दिलं नाहीच. सातत्याने, ह्या ना त्या मार्फत मला खुणावत राहिला, पण सोडून दिलं नाही मला. "भिऊ नको मी तुझ्या पाठिशी आहे" अगदी असेच. आता ह्यापुढे आधुनिक उपचाराला जोड म्हणून, उगाच सैरभैर न होता हाच आता रामबाण ईलाज म्हणून त्यानेच माझ्या कडून हे दररोज म्हणून घ्यावं हि विनंती. आता तरी मी खात्री पल्याड गेले आहे कि मी अजून ठणठणीत होणारचं. "तो" पाठिशी असतांना काय अशक्य आहे? बघा म्हणजे माझ्यासाठी "त्याला" आधुनिक तंत्रज्ञान शिकावं लागलं, वापरावं लागलं, लोकांना सद्बुद्धी देऊन सहभागी करून घ्यावं लागलं आणि माझ्या पुढ्यात मांडावं लागलं. मी तर अक्षरशः निःशब्द झाले. 


2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...