शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४

2038: Guilt faded away

 

I began my professional career at a very young age. It was my mother's perspective on life; at the time, her core beliefs were to "learn to survive," "learn to earn," or "prove that earning is easy." And as a result, I carried on being a working mother full-time. When I had to leave my most precious children with someone, I used to cry uncontrollably. However, I overcame myself and continued, and the guilt began to mount. I still carry a heavy burden of regret over not staying at home to give my kids my whole attention. For someone like me who enjoys sleeping peacefully, it is nevertheless so terrible that it has turned into a nightmare. The guilt started to surface more and I began to struggle more. Eventually, I felt like I needed professional help because I had kind of preserved and nurtured that guilt within me.

 

Around the same time, I came across a lot of write-ups, articles, videos, podcasts, interviews, etc., in which there were many examples. For instance, someone said she stayed with her grandmother consistently from the age of 8 months to 18+. Others portrayed twins who were divided from birth and were entirely cared for by two grandparents very happily. In other cases, parents kept their children with grandparents because of work, further education, economic conditions, and other reasons they knew.

 

I was inundated with remarkably similar yet distinct stories within the same category. As these numerous stories appeared out of nowhere, seemingly with a purpose, I began to recall a great deal of more stories from earlier archives. Regardless of their upbringing, all children greatly admire and respect their parents. And suddenly, it was as though I felt lighter than feathers, as though my entire load had been lifted, or perhaps more accurately, had begun to wash off from my shoulders. I am grateful for all the stories and the channels via which they were shared with me. They have undoubtedly relieved me of a great deal of baggage.

बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४

२०३६: एक वेगळी बाजू


आपल्या देशात इतके विविध पदार्थ का आहेत? त्या विविध पदार्थांमधे इतके वेगवेगळे मसाले किंवा जिन्नस का घातले जातात? आपली भाषा इतक्या हजारो शब्दांनी परिपूर्ण का आहे? आधीच्या काळी आणि आता सुद्धा काही ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती का होती / आहे? बहुतांशी मुलं (सगळी नाहीत, अपवाद आहेत) सदा काही ना काही कुरबुरी का करत असतात? "ससुराल गेंदा फुल... " असे गाणे का लिहिले गेले? असे अनेक प्रश्न माझ्या देखत उभे ठाकले आणि त्याचे उत्तर देखील ताबडतोब मिळाले. ते असे, कि जे सातत्य टिकवून ठेवतात ते आज ह्या जिन्नसाला तर उद्या त्याला नावं ठेवतात, असं महिनाभर / काही वेळ  सुरु राहतं  आणि मग ये रे माझ्या मागल्या सारखं पुन्हा ते मूळ पदावर / जिन्नसावर येऊन विराजमान होतात. आधी काही शब्द उच्चारले जातात, मग विविधता आणि त्यांची माहिती किंवा दरारा (त्यांच्या दृष्टीने) टिकून राहावा म्हणून विविध पातळीवर जाऊन "उचलली जीभ.." असं करायचं. म्हणून तर शिकलेत शाळेत आणि महाविद्यालयात जाऊन हे सगळे, उच्च विद्याविभूषित. एक जण असा कमी होता म्हणून मग बाकी बारी बारी सुरु होतात. काय मज्जा आहे ना विविधतेत एकता. कुठल्याही स्तरावरची मुलं असोत, शिकलेले, न शिकलेले, उच्च पदस्थ, अगदी साधे मजुरी करणारे, गोरे काळे, उंच ठेंगणे, सगळे. आत्ता लक्षात आलं, इतके पदार्थ, जिन्नस, शब्द मग कसे वापरले जातील ना? वाया जाईल सगळे कष्ट आधीच्या लोकांनी केलेले, जिन्नस शोधण्यास, पाककृती तय्यार करण्यात, शब्द संग्रह मोठा करण्यात ई. म्हणून हे उपटसूंभ सुरूच ठेवतात आणि त्यांचं अस्तित्व अजिबात कमी होऊच देत नाहीत. पुढील व्यक्तीने आता ठरवायचं कसं, काय आणि कितपत वागायचं ते, सगळं सांभाळून. 


मला फक्त आज पर्यंत एकाच बाजू ठाऊक होती ती म्हणजे प्रत्येक दहा मैलावर भाषा,  संस्कृती,खाद्य पदार्थ, बोली असं सगळं बदलतं. अनेक कचेरीतुन कर्मचारी वैविध्य देशात कामाला पाठवले जातात कारण त्यांनी तेथील सभ्यता, आणि चांगल्या गोष्टी, आदर्श, आदर कसा बहाल केला जातो हे सगळं शिकून यावं, आत्मसात करावं, आणि ते त्यांच्या कृतीतून दृश्य दिसावं, इतकं कि बाकी लोकांमधे पण आवश्यक बदल घडेल. अनेक पद्धतीने पदार्थ होऊ शकतो, प्यासिव्ह ऍक्टिव्ह व्हॉइस, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग शाळेत शिकवले आहे ते वापरण्याकरता हे विसरून चालणार नाही. सगळं आधी द्या तर घ्या, मिळावा असं काहीस असतं. विविध शब्द, चवी, संस्कृती, पद्धतीने हळूहळू व्यक्तिमत्व घडतं, घडायला हवं. पण अनेक ठिकाणी हे पाहायला मिळत नाही. हे दृश्य, चित्र नक्कीच बदलायला हवं. म्हणजे सगळेच गुण्या गोविंदाने नांदतील. 

२०३५: स्वरूप बदल


अवंती नावाचा अर्थ अंतहीन, विनम्र असा आहे. अवंती हे नाव खूप सुंदर आहे आणि लोकांना हे नाव आवडते. मराठी प्रचलीत असे हे नाव आहे कारण या नावाचे स्वतःचे महत्त्व आहे. अवंती चा अर्थ अंतहीन, विनम्र असा आहे आणि अशी सुविद्य लेक, तिची वैशिष्ट्ये, स्वभाव आणि वर्तन त्याच्या अर्थानुसार असणारच. अजून काही ठळक वैशिष्ट्ये आहेत अवंती ची, स्थिर, शांत, घर प्रेमळ, तपशील देणारी, आज्ञाधारक, विश्वासार्ह, तार्किक, सक्रिय, संघटित, जबाबदार आणि विश्वासार्ह. (babynameseasy.com)


अवंती हे नाव सामान्यतः आश्चर्यकारक व्यवस्थापन कौशल्यांसह आशीर्वादित आहे. ती विखुरलेल्या दस्तऐवजांचा सारांश, क्लिष्ट परिस्थिती सांभाळून घेण्यात  आणि संयमाने समस्या हाताळण्यात खूप चांगली आहे. आणि तिच्या कडे सुपर रिजनिंग पॉवर असल्यामुळे / तर्कशक्ती, तर्क-वितर्क मांडणे, तर्क समाविष्ट करून घेणे ई. सहज साध्य होते, जे संशोधन करण्यासाठी, म्हणजे विद्यावाचस्पती ह्या उंची वरचे, स्थराचे, फार महत्वाचे आहे. आणि ते अवंतीने करून दाखवलेच. माझी आणि ह्या अवंतीची, डॉक्टर. अवंतीची ओळख साधारणतः २०१३-१४ च्या दरम्यान झाली. आम्ही एकत्र एका खास प्रकल्पावर काम करत होतो तेव्हा. आम्ही दिड वर्ष एकत्र काम केले, बहुतांशी दररोजच, कारण कामाची उंची तशीच होती, खूप काही करून दाखवायचं होतं. अनेक दस्तावेज ठराविक पद्धतीने तय्यार करायचे होते, उभे करायचे होते. आणि आम्ही बहुतेक सगळ्या जणी पहिल्यांदाच ह्यावर काम करत होतो. ती एक वेगळी ऊर्जा होती आणि ती टिकवून ठेवायचे काम अवंती ने बखुबी निभावले, अर्थात ती ज्या एका बहुगुणी मॅडम सोबत काम करत होती त्या देखील होत्याच दिशादर्शक म्हणून. पण अवंतीने खूप मस्त सगळं घडवून आणलं. ती आधी आंतरराष्ट्रीय महाविद्यालयात शिक्षकेतर पद्धतीने आपले योगदान देत होती, मग ऐके दिवशी तिने शैक्षणिक क्षेत्रात येण्याचे ठरवले, ती भल्यामोठ्या संस्थेत रुजू झाली आणि तदनंतर PhD ला सुरवात केली. केवढा मोठा आणि वेगळा बदल होता तो. पण तिच्या मूळ स्वभावामुळे ते सहज शक्य झालं. एवढ्यातच आमची अवंती डॉ. अवंती झाली. करावं तेवढं कौतुक कमीच आहे अवंतीचं. मी स्वतःला लेखिका समजते, अर्थात लघुकथा किंवा अनुकथा टिपणारी एक मुलगी, पण मला सुद्धा योग्य शब्द सापडत नाही आहेत, जुळवाजुळव जुजबी करण्याचा हा छोटेखानी प्रयत्न आहे माझा.  तिच्या भव्य याच्यापुढे हे चार शब्द फिके, पण खरंच लिहावसं वाटलं. म्हणून हा पंक्ती प्रपंच. खूप म्हणजे खूप काही शिकण्यासारखं आहे डॉ. अवंती कडून निश्चितच.   

2034: The paradigm shift

 

In Italian, Avanti, means "forward." The Avanti kingdom once ruled over what is now the state of Madhya Pradesh in ancient India. As I learnt more about this phrase, I discovered that it is enduringly well-liked not just in India but in many other nations as well. Whether this name stays in use as a child's name or the name of any business, it also has some intriguing meanings such as infinite, humble, modest, etc. That's why it's so well-known. "By keeping the name Avanti, your child also starts behaving like the meaning of this name," stated one of the most well-known websites. I will extrapolate this statement to all the businesses that carry this meaning or operate under this name.

 

Given this context, allow me to share one of my favorite experiences to date. Late 2013 or early 2014 was the time. I was selected or elected to serve on the university-level committee for the NAAC's Criteria-2, which encompasses a number of institutions. It is a crucial and significant criterion to focus on. The team was made up of numerous academic members from various institutes, and we truly collaborated closely with each other. There were a number of reasons, the primary one being that this was the first time we had ever undergone such extensive accrediting process. The top of our criteria, the most modest and knowledgeable ma'am, came in second.

 

The most significant, in my opinion, was Avanti—a modest, amiable, and, I suppose, Mam's assistant at the time. She was our driving force as she worked in the university's Academics department and because of her overall demeanor, understanding nature, tireless work ethic, attention to detail, time management abilities—the list goes on and on. After some time, the same Avanti transitioned from non-teaching employment experience to teaching. joined the most challenging flagship institute and began her doctoral studies. What a paradigm shift, wow. It's OK for a teaching faculty member to opt for a PhD after many years, but this was very different.

 

Ms Avanti recently demonstrated her infinite capabilities by receiving a management doctorate. Truly amazing accomplishment—she practically lived up to her moniker. Although I refer to myself as a blogger, I am likewise at a loss for words when describing her character, diligence, dependability, and approach to multitasking. There is a plenty to learn from Dr.Avanti.

२०३३: मिसळणीचा / मसाल्याचा डब्बा


प्रत्येक भारतीय घराची शान, आन, बान म्हणजे स्वयंपाक घरातील सर्वात महत्वाची वस्तू, तो डब्बा ज्यात वैविध्य मसाले किंवा स्वयंपाक करण्यासाठी लागणारे महत्वाचे जिन्नस मांडलेले असतात. प्रत्येकाकडे कदाचित एकसारखे चित्र असायला हरकत नाही त्या डब्याचे पण कदाचित रंग वेगळे असू शकतात. जसा त्या अन्नपूर्णेचा सूर, ताल, लय त्या पद्धतीनेच विविध पदार्थांचे रंग खुलतील. तिला जे अत्यावश्यक आहे, जे गरजेचे आहे ते ते त्या डब्ब्यात पहुडलेले दिसणार सर्वांना. हा डब्बा म्हणजे तिचा मदतनीसच. प्रत्येकाची एक खासियत, एक चव, एक ढंग.  तो त्या पदार्थाला त्याच्या पद्धतीने वृद्धिंगत करतो, इतका कि चव जिभेवर रंगळणाराच, कायम, किंवा बऱ्याच वेळ. तृप्त नक्की होणार खाणारा, चव घेणारा आणि संतुष्ट होणारे अनेक. विविध खण, छोटेखानी झाकणा वीणा असलेलं भाग, वाट्या किंवा तत्सम अशी ती डब्याची मांडणी. प्रत्येक कप्प्यात किंवा वाटीत एक मसाल्याचा जिन्नस. प्रत्येकाचा सुगंध वेगळा, जडण-घडण वेगळी, अनुभव वेगळे, ताकद त्याहून निराळी. आपआपली प्रतिष्ठा सांभाळत, आपले अस्तित्व जपत / टिकवत तरी देखील बाकीच्या अनेक जणांसोबत सुखाने ते नांदत असतांना आपण सर्वच बघतो. कित्ती म्हणजे कित्ती शिकण्यासारखं आहे ह्या सर्वांकडून. कोणीही स्वतःचा वरचढ पणा सिध्द करायला जात नाही मुळी, कोणीच श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाहीत हे त्यांना देखील ठाऊक आहे. ते पण सजीव आणि दोन पायांचे आपण पण वेगळ्या पद्धतीने सजीव गटात मोडणारे. पण खूप वेळा हे आढळून आले आहे कि आपण उगाचच जेष्ठा-कनिष्ठा च्या शर्यतीत गुंफून घेतो, कळत - नकळत, उगाचच, गरज नसतांना आणि त्याचा परीणाम अनेक जणांवर होतांना दिसतो. तो मूळ पदार्थ, चव साधणे, दिसण्यास लई भारी तय्यार करणे, ई. सगळे विसरुन भलत्याच्या पाठी लागतो, काही जण सतत. त्यामुळे एक विनंति वजा आग्रह आहे, आताशा स्वयंपाक घर हे क्षेत्र फक्त मुलींकरता मर्यादित राहिले नाही आहे. सगळेच खारीचा वाटा उचलतांना दिसतात, म्हणजे सगळेच ह्या मिसळण्याच्या, मसाल्याच्या डब्याशी ओळखीचे आहेत. मग फक्त काही मिनिटांकरता त्याच्या कडे बघू नका, त्याच्या कडून मस्त बोध घ्या. म्हणून तर आपल्या पुर्वाज्यांनी हि डब्याची संकल्पना शोधून काढली आणि वापरात आणली. त्या मागचं हे महत्वाचं कारण आहे असं समजा आणि सुरु व्हा, अत्यानंदाने, शांततेने आणि समाधानाने असंख्य, वैविध्य प्रकारच्या जिन्नसांसोबत पुढे जायला, मार्गस्थ व्हा.  

२०३२: बरं झालं


तर त्याचं थोडक्यात असं झालं कि आज मी नेहेमीच्या पद्धती प्रमाणे सकाळी सर्वांसाठी न्याहारी तय्यार करायला सुरवात केली. काल खूप मस्त, तरोताजा मेथीची जुडी आणली होती बाजारातून, म्हणून सर्वांसाठी मेथी पराठ्याचा घाट घातला. माझ्या खाण्याच्या तक्त्याप्रमाणे आज थालिपीठ होते, म्हणून एक थालिपीठ करायला घेतले. गोळा मळतांनाच मला काहीतरी जाणवलं, थापतांना पण वेगळं वाटलंच, पण म्हटलं होईल मस्त. आणि सगळा स्वयंपाक उरकल्यावर मग मी ते थालिपीठ भाजायला घेतले. तवा ठेवला तापायला आणि त्याच्याकडे कुठे बघत बसू म्हणून थोडीशी बाकी कामे करायला घेतली. ती करता करता थालिपीठाकडे लक्ष होतं. म्हटलं उलटावं म्हणून उलथनं घेतलं आणि मस्त तुकडे पडले त्या थालिपीठाचे. मग काय एक एक तुकडा व्यवस्थित पुन्हा सजवून ठेवला गरम तव्यावर पूर्णपणे, दोन्ही कडून शिजायला. मस्त खुसखुशीत तय्यार झाले थालिपीठ लवकरच. हे सगळं करत असतांना मला माझ्या बाबांची प्रकर्षाने आठवण आली. ते जर आज माझ्या शेजारी उभे असते थालिपीठ करतांना, तर त्यांनी अत्यानंदानी म्हटले असते, "चला तुकडे करायला नको खाते वेळी, मस्त आयते तुकडे करून मिळाले. प्रत्येक तुकडा छान खरपूस भाजला गेला आहे, कारण छोटेखानी भाग आहे म्हणून. कित्ती सोप्प झालं हे". ई. त्या जुन्या पिढीतले असले तरी त्यांच्या तोंडी ठराविक, टिपिकल, वैशिट्यपूर्ण असे शब्द कधीच नव्हते, कि "साधं थालिपीठ करता येत नाही? मुलगी आहेस ना? शिकवलं नाही आईने का शिकली नाहीस तू ?" ई. असे. त्यामुळे त्या वेळ पासूनच मला हि अशी सवय. कारण प्रत्येकाकडून गडबड होतेच. आता आजचे थालिपीठ बघा ना? माझ्याकडच्या थालिपीठांना एक सवय झाली आहे, कालची आमटी, किंवा वरणाचा गोळा, उरलेली भाजी सकाळची ई. मस्त साग्रसंगीत घालून मग करायचे / थापायचे ते. पण आज भाजणीशिवाय काहीच उरलेले नव्हते त्यात टाकण्या करता, म्हणून महाराज काही अंशी रुसले, आणि तुकडे झाले उलटतांना, किंवा मी जरा घाई केली हलवायची, असे पण असेल. काही का असेना मला बाबांची उपस्थिती जाणवली, गरमागरम थालिपीठ काप खातांना / फस्त करतांना मज्जा आली, आणि आताशा जे सगळे आधुनिक गुरु सांगतात, समजावतात आणि आपण सगळे ते पाळण्याचा प्रयत्न करतो ते कित्येक वर्ष आधी मला माझ्या बाबांनी त्यांच्या दररोज च्या कृतीतून दाखवून दिले आधीच. क्या बात है? कित्ती भाग्यवान आहे मी. हे असं वागलं कि दोन्ही पक्ष एकदम शांत, घरातले वातावरण निर्मळ / हलकेफुलके असे, आणि त्यामुळे पुढच्या कामाला एक वेगळा विश्वासपूर्वक जोम येतो करायला. नाण्याची दुसरी बाजू बघणे, त्या प्रमाणे विचार करणे, वागणे ई. कित्ती महत्वाचे आहे हे ह्या छोट्या प्रसंगामुळे मला समजले.  

शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४

२०३०: मानाचा ठेचा


मी इतक्यात एका दूरच्या भागात पहिल्यांदा गेले कारण तिकडे जायचे कधीच काहीच कारण नव्हते. ते ठिकाण बरेच दूर आणि नवीन असल्यामुळे, किंबहुना आताशा मी टॅक्सिने प्रवास करण्याला प्राधान्य देते. त्यात चार डोळे आहेत, सगळीकडे बघण्याची, टिपण्याची आधीपासूनच सवय आहे, त्यात मी फार मोठी खवैयि आहे, ह्या सगळ्याचा परीणाम म्हणजे मला एक पाटी दिसली. खूप चविष्ट, चवदार, अनोखी पाटी होती ती. आणि त्या पाटीकडे लक्ष जाणार नाही हे तर अशक्यच. त्यावर असं काहीसं लिहिलं होतं "ठेचा वडापाव", अहाहा च. असं वाटलं ना कि ताबडतोब गाडी थांबवावी आणि चव घ्यावी, पण काम पुढे उभं ठाकलं होतं त्यामुळे स्वतःला कसबसं आवरलं त्यावेळी. पण मला कल्पना फार आवडली. एक तर तो वड्यात जास्त प्रमाणात, म्हणजे व्यवस्थित चव येईल इतपत ठेचा घालत असणार, किंवा हिरव्या / लाल मिरच्यांचा ठेचा पावला लावत असणार, चटणी सोबत किंवा ऐवजी. असं काहीसं असणार, घरी आता नक्की करून बघते लवकरच.  


हे काय कमी होतं आज कधी नव्हे ते खूप दिवसांनी इंग्लिश वर्तमानपत्र हातात घेतले चाळायला आणि काय महद आश्चर्य, एक पान भर जाहिरात आहे, शाकाहारी मांसाहारी दोन्ही पद्धतीचे पदार्थ नव्या ढंगात सादर केलेत. अर्थात इतकी मोठी जाहिरात म्हणजे असं च काहीसं असणार नाहीतर लाखात कोण कशाला खर्च करेल उगाचच.  म्हणून बघितले तर माझे चार डोळे मला खूप काही वेगळे सांगत होते, खुणावत होते. चक्क विदेशी पदार्थ जे भारतात विकले जातात, भली मोठी कंपनी आहे ती, त्यांनी पण ठेचा आवृत्ती काढली आहे, क्या बात है नाही, सहीच. 


म्हणजे बघा, त्या ठेच्याची महती कुठवर पोचली आहे ते आणि ठेचा हा काय चीज आहे, अद्भुत, जगावेगळी आणि कित्तीतरी वेळ जिभेवर रेंगाळणारी. अगदी प्रत्येक समुदायाला, वयोगटाला, आणि दर दिवशी भुरळ घालणारी अशी. मी चाट पडले आणि निःशब्द झाले ती जाहिरात बघून आणि वाढता ठेच्याचा सदुपयोग बघून.  मस्तच. 

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...