सोमवार, ४ नोव्हेंबर, २०२४

2083: A Perfect Example of Lateral Thinking



Lately, I’ve been fully immersed in conducting research writing workshops, focusing intensely on the value of lateral thinking. To me, lateral thinking goes beyond traditional “out of the box” ideas—it's about approaching problems from fundamentally different perspectives. I frequently share insights from renowned authors who have explored this powerful approach.

Today, I encountered an advertisement for an investment app called StableMoney that exemplifies this beautifully. This app allows users to invest in fixed deposits from multiple banks without needing a savings account with each one. Remarkable, isn’t it? Conventional wisdom, backed by longstanding RBI regulations, dictates that linked accounts are essential for such investments. But this app challenges that standard through a unique model, harnessing technology and creative structuring in a way that breaks with tradition.

Could such a concept have emerged from mere innovative thinking? Likely not. This is lateral thinking in action—thinking that disrupts norms to create entirely new pathways. Once again, this underlines my message in workshops: lateral thinking can unlock success in any field, even in research and writing. So, keep attending and supporting these workshops; let’s explore what lateral thinking can accomplish together.

hashtagResearchWriting hashtagResearchPapers hashtagPhDScholars hashtagResearchWriting hashtagOpenAITools hashtagSmartWritingWorkshops hashtagOpenAIForWriting hashtagResearchArticles hashtagReviewArticles hashtagLateralThinking hashtagHandsonWorkshops

रविवार, ३ नोव्हेंबर, २०२४

2082: Ignorance is Bliss


A professor, a hotel singer, and a world-renowned classical musician have all taught me invaluable lessons. My professor had been imparting this lesson for years, though it took time for me to grasp the deeper meaning behind it. This particular professor—brilliant, famous, and extraordinarily wise—had a unique approach. He would often teach with his eyes closed, opening them only occasionally. He paid no mind to students who might be daydreaming or ignoring his words; he simply focused on delivering his lesson. He was there to teach, and that alone was his purpose.

Recently, I watched the latest season of Indian Idol on Sony. One contestant, an immensely talented singer with a foundation in folk music, shared that he performs regularly with his troupe at hotels. Yet, despite their skill, their music is often treated as mere background noise, unnoticed by guests. They aren’t even acknowledged, he said. But they find motivation within themselves, enjoy each other’s company, and fulfill their duty to perform, regardless of the audience’s attention.

This lesson came full circle when I attended a Diwali morning music retreat, where a world-class classical musician performed. Amidst the distractions of people moving around, snapping photos, chatting, and scrolling through their phones, he remained entirely unbothered. He was deeply immersed in his art, finding fulfillment in the music itself, focused on his craft and class rather than the response of those around him.

As a teacher, I sometimes feel distracted or disheartened without my students’ undivided attention. But these examples have shown me the beauty of staying focused on one’s purpose, regardless of external distractions. Indeed, ignorance is bliss. Focus on your duty and let go of the rest.

2081: A Reflection on an Important Truth



In my workspace, within our close-knit circle, we had a habit of calling each other by our initials. It wasn’t for any specific reason—it just became our unique way of interacting, and we enjoyed that little quirk. At the end of each workday, as we walked out of the office and headed home, we’d often cross paths with others, exchanging goodbyes. Some would watch me walk and tease, “PM, why are you walking so slowly?” They meant it with humor and affection, and I’d always respond, “Well, see, it’s thanks to me that you notice your own speed. My slow pace gives you a chance to appreciate your fast one! So, a big thank you to me.” This exchange became a regular part of our day. Due to a major issue with my leg, my pace had slowed to almost a crawl, but that’s all in the past now.

I bring up those memories because they remind me of a broader observation about life in my generation, especially for middle-class families in India—the largest demographic. For many women, a career was a balance between family responsibilities and work. Many of us chose jobs with fixed hours, as our commitments at home took priority. These time-bound roles often came with lower pay, especially compared to our husbands, who could invest more time in their careers. They could focus consistently, take fewer breaks, and maintain their health, allowing them to earn more. And, in a way, a significant part of their success could be attributed to us, their wives, who chose to work within limitations, contributing as a secondary source of income.

From my perspective only, that difference in earnings between husband and wife often stems from her choices—choices made to support the family as a whole (popularly referred as secondary (income)). While there are exceptions, they are few and far between in this reality.

२०८०: तुलनात्मक अनुभूती


मी मागल्या वर्षी स्वेच्छा निवृत्ती घेतली. एका वर्षात अनेक ठिकाणी संशोधन करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेतल्या. दिवाळी च्या आधी जी कार्यशाळा होती तेव्हा त्या कचेरीतले सगळेच वेगळ्याच स्थितीत आढळले मला, खूप खुश होते. त्यांना ह्या वेळी तब्बल एक आठवड्याहून अधिक काळ सुट्टी मिळणार होती. सगळीकडे एकच सूर होता तो म्हणजे सुट्टी आणि बोनस. मी पण एक माणूस आहे आणि अश्याच एका ठिकाणी कामाला पण होते अनेक वर्ष. इतकी मोठी सुट्टी मिळणं आणि बोनस ह्या बद्दल मी नक्कीच काय भावना असतील ते समजू शकतेच. पण कुठेतरी क्षणभर वाटलं मात्र ह्या वर्षी मी बोनस ची हकदार नाही, सुट्टी पण नाही. काही चुकलं का इतक्या लवकर निवृत्त होऊन? अगदी तेव्हाच जसे कि कोणी तरी उत्तर द्यायला माझ्या शेजारीच बसले होते असे ताबडतोब उत्तर गवसले कि अगं ह्यांना तर केवळ आठवडा सुट्टी मिळाली आहे आणि तुला सुट्टीच सुट्टी, हवं तेव्हा कामावर जा नाही तेव्हा काही वेगळं कर. जी विविध कामे माझ्यापर्यंत पोचत आहेत, माझ्या हातून घडत आहेत ते बोनस नाही तर काय आहे? पैश्याच्या स्वरूपात पण आहे आणि नवीन ओळखीच्या देखील. बोनस म्हणजे निवृत्तीनंतर देखील अनेक ठिकाणी तो पोचते आहे, तब्बेत सुधारते आहे, पायात बळ येत आहे, नवनवीन शिकायला मिळतं आहे नाही तर तुझ्या वोर्कशॉप्स मधे नावीन्य नाही टिकून राहणार त्यामुळे तू जसं बघशील तसे दिसेल नाही का? मला काय बोलावं हे समजलचं नाही, माझ्याशी कोण संवाद साधतंय हे दिसत पण नव्हतं कारण डोळ्यात अश्रुनी जागा भरून गेली होती, पण काही का म्हणा ना मला काही क्षणात सगळं पटलं, उमगलं आणि लै भारी वाटलं. इतकं कि प्रत्यक्षात सुद्धा मला कोणी इतकं उत्कृष्ट रित्या आणि सोप्य्या भाषेत समजावून सांगितलं नसतं आणि ते देखील इतक्या कमी वेळात. क्या बात है? बाकीच्यांचं अगदीच मला काहीच माहिती नाही पण प्रत्येक अनुभवागणिक माझी श्रद्धा जास्त दृढ होते आहे हे निश्चित. कित्ती करतोय माझ्या साठी बघा ना, हाक मारायच्या आत माझ्या भावना पोचल्या पण त्याच्या पर्यंत. त्याच्या अदृश्य पद्धतीने समजावण्याची लकब बघा समोर देखील न येता पट्टाकिनी मला ताळ्यावर आणलं. कुठलीही तुलना नाही, पण त्या वेळी तसं झालं खरं नकळत अचानक. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मी कितीही धन्यवाद दिले तरी कमीच आहेत त्याला, मी हे अनुभवल्यावर अक्षरशः निशब्द झाले. 

शनिवार, २ नोव्हेंबर, २०२४

२०७९: संपादक


संपादन करणे म्हणजे आत्मसात करणे, सातत्याने शिकत राहणे, पादाक्रांत करणे नवीन शिखरं, ध्येय गाठणे आणि असे बरेच काही. संपादक हा संपादन करत अनेक कामे करत असतो ज्यात फक्त महत्वाचे लेखनचं नाही. तर तपासणे, पडताळणे, बारीकीने लक्ष देऊन लेख जसेच्या तसे घेऊन छापणे किंवा बदल करून. फक्त लिहिण्यावर ते थांबत नाहीतच. त्यांचा खास स्तंभ लिहिण्यासाठी दररोजच्या वर्तमानपत्रात त्यांना कितीतरी खोलात जाणून, सर्व बाजूंनी वाचावे लागत असणार, मनन, चिंतन करावे लागणारच तेव्हा ठराविक जागेत बसेल असा, लोकांपर्यंत पोचेल असा आणि वाचकांना भावेल असा लेख उतरला जाणार कागदावर, नाही का? मला काल पर्यंत संपादक म्हणजे एवढंच ठाऊक होतं, त्यांची कक्षा अशीच असेल ह्याची खात्री होती. पण काल जेव्हा मी आदरणीय राहुल देशपांडे ह्यांचा दिवाळी पहाट कार्यक्रमाला गेले तेव्हा एका संपादकाला ऐकण्याचा योग आला थोडक्यात. ते तर कोपरखळ्या मारून, शाब्दिक देत किंवा शब्दांशी उत्तम रित्या खेळत / वापरात प्रसंगानुरूप खूपच उत्कृष्ट बोलत होते. पण त्या सोबतच ते खूप काही सांगून गेले. त्या ठिकाणी भले मोठे फलक लावले होते.  त्यात ह्या संपादकांचे वृत्तपत्र तर होतेच पण त्या सोबत बाकी आघाडीच्या वर्तमानपत्राचा लेखाजोखा मंडला होता. ह्याचाच अर्थ ह्या संपादकांना त्यात देखील लक्ष घालावे लागत असणारच कि कुठले वृत्तपत्र कसे लोकांच्या पसंदीस पडते आहे, का?, बाकी कुठे उत्कृष्ट आहेत, कमी पडत आहेत? ई. आपले वर्तमानपत्र कसे परफॉर्म करते आहे हे बघता बघता ते देखील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शिवाय बाकी जण काय करत आहे, काय नाही? मग जाहिरातींमधले लक्ष, बातम्यांच्या शब्दांकडे, किती पाने, कोणत्या दर्जाची, कुठले रंग वापरायचे, दिवाळी अंक, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीचे, मोबाईल आवृत्ती, वेबसाइट, अँप ई. बापरे हि यादी भली मोठी आहे. एका बातमीचे अनेक प्रकार आणि आकार देखील. छापील बातमी पानांवर अवलंबून, वेबसाइट वरची साधारण छापत अशीच, पण अँप किंवा मोबाईल आवृत्ती जरा छोटी लिंक सोबत दिलेली. हि सगळी माध्यमं बघत, खात्री करत दररोज पुढे जायचं म्हणजे कमाल कमाल आहे. संपादन सामर्थ्य किंवा कौशल्य, अनेक कक्षा असलेले असं  कार्य आहे. काय काय संपादन करायचं हे अमर्याद आहे माझ्या मते. आंतरराष्ट्रीय दर्जांपासून, ते गावापर्यंत, आर्थिक गणितं ते सामाजिक भान, खेळ ते काव्य आणि कला.... जरी खूप मोठी चमू काम करत असली ह्या भल्या मोठ्या १८-२० पानांवर रोज, तरी डोळ्यात तेल घालून सगळं बघणं, शिवाय दिवाळी पहाट सारखे कार्यक्रम आयोजित करणं, त्या करता अनेक लोकांच्या संपर्कात राहणं, अद्भुत असे विश्व असेल असे वाटते / वाटले मला काल. अर्थात प्रत्येकाच्या स्वभानुसार, त्या त्या वृत्तपत्राच्या संस्कारानुसार किंचित बदल होत असतील हि. कोणास ठाऊक. हा, एक कक्षा मांडायची राहिले. कदाचित ह्या बातम्यांवरून दूरदर्शनवर माहिती देत असतील जर त्यांची वाहिनी असेल तर. म्हणजे कदाचित त्यांना वेळेत सगळं मिळाले आहे कि नाही ह्या कडे पण लक्ष द्यावे लागत असेल. 


अश्या विविधांगी गुण असलेल्या संपादकांना नमन.   

शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०२४

२०७७: मोगरा फुलला


एक संतवाणी जी आपण सर्व अनेक वर्ष, पिढ्यांपासून ऐकतो, गुणगुणतो आणि गातो आहे. संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर माउली रचित अशी हि शब्दसुमने आहेत. खुप सुंदर अर्थ, संथ पण भावपूर्ण चाल आणि सहज गुणगुणता येईल अशी. त्यामुळे खूप प्रचलित असे हे भावगीत, भक्तीगीत, अभंग आहे. आज अनेक सन्मान विजेते श्री. राहुल देशपांडे ह्यांच्या कार्यक्रमाला जायचा योग आला आणि त्यांनी हे गीत त्यांच्या यादीत सामील केलं होतं. हे गीत अचानक सुरु झालं एका बंदिशी नंतर. जसे हि सुरु झाले गायला, तसे सगळेच प्रेक्षक हळुवार आवाजात गायला लागले.  एक तर संपूर्ण छोटेखानी गीत सर्वांनाच पाठ आहे आणि त्यामुळे एक वेगळी साथ मिळाली, सगळेच सहभागी झाले अचानक न ठरवता आणि एक माहोल तय्यार झालाच. 

हा अनुभव घेतल्यावर ह्या गाण्याविषयीच्या खास आठवणी जाग्या झाल्याशिवाय राहिल्या नाहीत. बहुतेक वर्ष होते १९८९ किंवा कालावधी होता १९८९-१९९३ चा. साधा काळा फोन पण पोचला नव्हता आमच्याकडे, तरी देखील आम्ही सर्व मित्र-मैत्रिणी सर्वांच्या वाढदिवसाला भेटत असू, आवर्जून. कसे काय जमत होते मोबाईल शिवाय तेव्हा कुणास ठाऊक पण जमलेच नाही तर खूप मस्त निभावले, मज्जेत, अत्यानंदात असे. वाढदिवस म्हणजे एकत्र जमणे कुठेतरी, साध्या दुचाकींवर मग आधी एक मोठे कार्ड विकत घेणे, सह्या करणे, काही मजकूर लिहिणे आणि मग यथेच्छ ताव मारणे खाण्यावर, गप्पांवर सुद्धा. प्रचंड गप्पा, हश्या आणि मौजमस्ती होत होती. सर्वच बहुतेक खवैये होते, सगळं चालायचं, घरचंच मस्त केलेलं मग काय विचारता?, "आण दो" असे काहीसे. त्यात आवर्जून गाणी होतीच, अविभाज्य घटकांसारखी. एक्का दुक्का म्हटली जायची पण त्यात मोगरा फुलाला होते बरं का, आणि हे सगळं माझ्या आठवणीत होतेच पण जेव्हा आज प्रकर्षाने त्या सर्व मैफिलींची आठवण आली ते थेट मी नागपूरलाच पोचले अगदी सर्वांच्या घरी जाणून फेरी मारूनच आले. "आजी सोनियाचा दिनू" म्हटल्यासारखे जगलो आम्ही सगळे ते दिवस उत्कृष्टपणे. टीव्ही होते बऱ्याच जणांकडे पण तो लावण्याची गरजच पडली नाही. आम्ही, आमच्या गप्पा, रस्सीखेच, मधेच एखादे तज्ञा सारखे कोपरखळी मारलेले वाक्य यायचे, घरचे पण थोडक्यात आमच्यात त्या वेळेपुरते सामील व्हायचे आणि कार्यक्रमाची सांगता व्हायची. 

आजच्या "दिवाळी पहाट" आयोजकांना अनेक धन्यवाद मला माझ्या माहेरची सफर घडवून आणल्याबद्दल.  तो मैत्रीचा मोगरा फुलला त्या वेळी, सदैव बहरलेला राहिला, सर्वांना सुगंध देत, आणि बुद्धिमतेच्या, जिद्दीच्या, मेहेनतीच्या बळावर, जोरावर प्रत्येकाचा वेलू गगनावर त्यांच्या प्रतीने पोचला. इतके प्रथितयश झालेत सर्वजण ह्या इतक्या वर्षात पण अजूनही आमची मैत्री कायम आहे, टिकून आहे.  संपर्कात आहेत सर्व ह्या तंत्रज्ञानामुळे, म्हणजे बघा ना "क्या बात है".  आमचा मोगरा वर्षभर, वर्षानुवर्षे असाच फुललेला असतो, फक्त एका ऋतू पुरता मर्यादित नाहीच. तो असाच बहरलेला आणि सुगंधित राहू दे हि प्रार्थना.

२०७४: पक्षांचा मित्र


मी अगदी लहान असतांना, नकळत्या वयातच माझ्या घरी माझ्या सोबत आधी एक आणि नंतर दोन भन्नाट व्यक्तिमत्व राहायला, वास्तवाला आले आणि अनेक वर्ष सोबत दिली. अगदी नकळत घडले ते आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी मग त्यांना ठेवून घेतले, किंबहुना ते राहिले आमच्या सोबत. एक अगदी नुकतेच जन्मलेले, नीट उडता न येणारे पोपटाचे पिल्लू आमच्या अंगणात आले. आमच्या घराच्या आसपास तेव्हा अनेक मांजरी, बोके, माकडं अशी सगळी मंडळी होती त्यामुळे आईने त्याला एक टोपल्यात ठेवले आधी, न हात लावता, आणि काही वेळातच त्याच्या साठी नवीन कोरा पिंजरा आणला गेला. काही महिन्यात पुन्हा अशीच घटना घडली आणि अजून एका पोपटाच्या पिल्लू ने आमच्या घराचे सदस्तव पत्करले, मी त्याला "मिठू देशपांडे" असे म्हणायची. एकूण पाच सदस्यांचे घर त्यामुळे. 


एवढ्यातच मी अचानक एक आणि तदनंतर अनेक पोपटांच्या संभाषणाचे व्हिडीओ बघितले. अर्थातच सजीव प्राणी / पक्षी आहे म्हणजे ते संवाद साधणारच एक मेकांशी त्यांच्या त्यांच्यात आणि मिठू म्हणजे माणसांशी सुद्धा. त्या सर्व व्हिडीओ चा मतितार्थ असाच होता कि कमीतकमी एका वेळी दोन मिठू जर उत्कृष्ट संवाद साधत आहेत, मागे राहते घर दिसतंय म्हणजे त्या घरात संवाद खूप सुंदर आहे, तिथले संबंध फार छान आहेत आणि भाषा बोलकी, सहज, मनमिळावू अशी आहे ई. अर्थात हे तज्ज्ञांचे म्हणणे आहे, आणि मला ते पटले देखील. 


आमच्या घरी पोपट सगळी दारं खिडक्या बंद करून मोकळे सोडले जायचे म्हणजे ते अजून रुळातील, पंखातील ताकद समजेल, व्यायाम होईल आणि सारखे बंद पिंजऱ्यात नको म्हणून देखील. तर अशी मी वाढले त्या मिठू देशपांडे सोबत थोडक्यात, त्याच वागणं, बोलणं, शिट्ट्या मारणं, मला शाळेला उठवणं (आईचे आकिवून अडकून पट्ठ्या नक्कल करत असे, आईचं एक काम कमी, तिच्या घश्याला आराम). 


हा सगळा भूतकाळ आठवायचे कारण म्हणजे आज मला प्रकर्षाने एक ह्या पक्ष्यांचा नवा दोस्त आढळला. आता ती दोघे कसा संवाद साधत असतील? कसे घेत असतील एकमेकांना? त्यांना आवडत असेल का दोघांचे अस्तित्व? काय मनात विचार येत असतील दोघांच्या? कोण सुरवात करत असेल? संवाद होत असेल कि नाही? ई. असंख्य प्रश्न उत्पन्न झाले माझ्या मनात जेव्हा मी एकाच आकाशात, आसमंतात दोन वैविध्य प्रजातींच्या पक्षांना उडतांना बघितले एकाच आवारात, एकाच वेळी.  एक म्हणजे विविध प्रकारचे पक्षी आणि दुसरे म्हणजे ड्रोन. ड्रोन ह्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर शिकता येते आणि पक्षांना दैवी देणगीच्या. एक नैसर्गिक एक अत्याधुनिक. दोघे मानवाचे दोस्त. पण आसमंत एक, मग? ड्रोन पक्षांची भाषा, आपण त्यांच्या मुलखात, प्रांतात आहोत हे जाणत असतील का? जाणण्याची गरज आहे का? का फक्त सांगितलेलं काम करायचं आणि झालं? मला नाही वाटतं असं, त्याच्या कक्षा ते वाढवत असतील किंवा खूप लवकर वाढवतील. मी ड्रोन-प्रोग्रामिंग च्या क्षेत्रात काम करत नाही त्या मुळे मला ठाऊक नाही खास काही, पण उत्सुकता वाढली आज दोन्ही प्रकार एकत्र वावरतांना बघून.  एक जण खरंच दिवाळी पहाट चा आनंद घेत होतं आणि दुसरा तो आनंद अनेक दिवस / महिने / वर्ष सर्वांना मिळावा ह्या साठी साठवून ठेवण्याचे काम करत होतं. सहज सुलभ उड्डाण भरत, नावीन्याने + मधुर स्वराने भरपूर अश्या भारावलेल्या वातावरणाचा आस्वाद घेत पक्षी विहार करत होते आणि ड्रोन सांगेल तेथे जाऊन सांगेल ते टिपत होते, वातावरणाशी, कोण गातंय, काय कार्यक्रम आहे ह्याचा त्यांच्याशी सूत्राम संबंध नव्हताच. दोन्ही गट मस्त विहार करत होते, सर्वांसोबत कुठलाही अडथळा न घेता, आणता. मज्जा आली तो नजारा बघतांना. काही क्षण तर असे होते कि अरे पक्षी नक्की कुठला आणि (अ) पक्षी कुठला हे कळत किंवा दिसत नव्हतं माझ्या चार डोळ्यांना.  


उद्या तुमच्या खिडकीत बसून जर दोन मिठू "काय रे तो व्हिडिओ कसा आला? किंवा किती वेळ टिपायचा आहे हा सिन? सेव्ह केले फोटो, आता काय करू?" ई. डायलॉग बोलू लागले तर आश्चर्य मनू नका कारण तो अत्याधुनिक शब्द-संवादांचा परिणाम असू शकतो, किंवा चार डोळ्यांनी नीट बघा पोपटच आहेत ना? का त्याच रंगांचे (अ) पक्षी उमेदवार आलेत चुकून. लक्ष असू द्या मित्रांनो, दोन्ही कडे, एक स्वतःच्या संवादांकडे आणि पक्षांकडे देखील.   

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...