गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०२४

2087:व्यायाम


मी जेव्हा नियमीत फिजिओ थेरपी ला जात होते तेव्हा काही रुग्णांना विविध व्यायाम करतांना बघितले त्यांच्या गरजेनुसार, किंवा तज्ज्ञांनी जसे सुचवले तसे आणि त्यात अगदी साधे साधे, रोजच्या वापरातले पण अनेक घटक होते. जसे कि दाराची कडी उघडणे, बंद करणे, विविध प्रकारच्या कड्या असतात आणि त्यामुळे कदाचित वेगवेगळ्या ठिकाणचा व्यायाम घडतो. त्यात एक भर पडली आहे आता सध्या माझ्या तर्फे, ती अशी कि, कि माझे स्वयंपाक घर आता माझ्या ताब्यात आहे. इतकी वर्षे मी कधी तरी हजेरी लावत असे तेथे. दोन्ही वेळा स्वयंपाक करणाऱ्या मावशी होत्या घरी त्यामुळे माझे फिरकणे क्वचित घडत असे तेथे. पण आता मीच शेफ असल्यामुळे अनेक प्रकारच्या बरण्यांना, डब्ब्यांना झाकण लावणे, उघडणे, दररोज न चुकतात व्यवस्थित रित्या वरण रवीने घुसळणे, एक सारखे करणे, कणिक किंवा पराठ्याचे पीठ मळणे, ते लाटणे, थालिपीठं थापणे, भाजणे, उलटणे, ताक तय्यार करणे आणि अशी अनेक कामे होत आहेत, ज्यामुळे देखील नकळत पण काही वेळा करता, दररोज, वेळोवेळी, ठरावीक काळापुरता व्यायाम घडतोय. का कुणास ठाऊक पण खूप म्हणजे खूप मज्जा येते आहे, इतकी कि मला दोन प्रश्न पडलेत, मी हे इतक्या उशिरा का करायला सुरवात केली? आधी का नाही केलं? हा एक आणि दुसरा म्हणजे ज्या स्वयंपाक करणाऱ्या सगळ्या जणी आहेत त्यांचा कित्ती मस्त व्यायाम घडत असेल मग त्या खुश का नसतात? मला तर कदाचित ह्या टप्प्या टप्प्याने होणाऱ्या व्यायामाचा परिणाम असेल पण एक वेगळीच ख़ुशी प्राप्त झाली आहे, टिकुन आहे आणि वृद्धिंगत पण होते आहे. हे खरंच एक वेगळं क्षेत्र आहेच, एक कला आहे. कळत होतं तेव्हा देखील मला पण वळलं नाही कधी, उशीर झाला पण हरकत नाही. आणि हे फक्त व्यायामा पुरतं मर्यादित नाहीच. कित्ती प्रकारचे रंग अनुभवायला मिळतात, वैविध्य पदार्थाचे, जिन्नसांचे टेक्स्चर, पोत (बारीक, खडबडीत, मऊ, दाणेदार असे) हाताळायला मिळते. जिभेला आणि शरीराला दररोज नवनवीन पदार्थ हवेच असतात त्यामुळे खूप विविधता मांडली जाते आणि त्यावर काम देखील होते. क्या बात है? हे काय कमी होतं म्हणून खाऊ घालण्याचे समाधान वेगळेच.  अहाहा च. एक छोटेखानी क्रांती घडते हातून असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीच. शिवाय "अथ: पासून इति पर्यंत", "हेड तो टो" संपूर्ण शरीराला, मनाला आणि प्रत्येक अणुरेणूंना व्यायाम घडतोच, सर्वांचा मस्त उपयोग होतो त्या स्वयं-पाक घरात. त्यामुळे माझ्यासारखा उशीर करू नका. शिरा त्या भागात आणि प्रयोग करून तर बघा. अगदी सहज जमेल आणि क्रांती घडेलच ह्यात शंका नाही.  

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०२४

२०८६: श्वास


इतक्यातच मी एका आधुनिक गुरूंचे निरूपण ऐकत होते तेव्हा आणि त्या नंतर बऱ्याच बाकी जणांकडून सुद्धा एक वाक्य कानावर पडले. "शेवटचा श्वास आपण घेतो हे आपल्याला माहित देखील नसते", किंबहुना केव्हा घेतो हे कळत देखील नाहीच. 


अगदी तसेच काहीसे मग डोक्यात आले कि पहिला श्वास घेतो तेव्हा तरी काय ठाऊक असते, काहीच नाही, श्वास अस्तित्वात येतो ते खूप वर्षांनी, ते देखील जेव्हा एखाद्या योगाच्या वर्गाला जातो तेव्हा  आणि योग गुरूंनी सांगितले कि श्वासाकडे लक्ष केंद्रित करा अगदी फक्त तेव्हाच, किंवा काही जण तेव्हा पासून ह्या असामान्य विदुषीला अनन्य साधारण महत्व द्यायला लागतात. एखाद्या सुंदर, देखण्या तरुण / तरुणीला बघितल्यावर कदाचित लक्षात येतं आपल्या श्वासाची वाढलेली गती. त्या नंतर अनेक छोटे प्रसंग आहेत ज्यात हे लक्षात येतं  पण तो वर आपण बऱ्यापैकी मोठे झालेलो असतो. 


शेवटचा श्वासच कशाला, आपल्याला अनेक गोष्टी कळत नाहीतच ना? त्यात मग बाप्पाचे आपल्या जीवनात असलेले अनन्य साधारण महत्व, आपली माणसे, आपल्यातला कण अन कण, अणुरेणू जे आपल्यासाठी सातत्याने, अथक कार्य करत असतात. बाह्य जग पण मदत देत असते, शृष्टी तर फक्त द्यायलाच आहे, पण लक्ष नाहीच. केवळ "मी", माझं हे आणि माझे ते, ह्या पल्याड जातंच नाही मग श्वासासारख्या अदृश्य घडामोडीला कोण बघणार, समजणार? सगळेच गृहीत धरले जाते, किंबहुना त्यांचे ते कार्यच आहे, त्यात काय मोठंसं? असं देखील वरून बोलले जातेच. त्यांचं कार्य आखून दिलेले आहे आणि ते करत आहेत, करायलाच पाहिजे वगैरे आणखीन जोड दिली जाते. आता अश्या व्यक्तिमत्वाला काय म्हणायचे बरे? 


तसं पाहायला गेलो तर आपण प्रत्येक जण फक्त नाममात्र आहोत, एक मीडिया, माध्यम, काही गोष्टी साध्य करण्यासाठी, नेमून दिलेल्या कार्यासाठी आहोत, आणि ते घडतंय. अर्थात प्रत्येक गोष्टीला व्यावहारिक दृष्ट्या एक नाव द्यावे लागते म्हणून तुमचे एक नाव आहे, घराला नाव आहे आणि मग फक्त आणि फक्त व्यावहारिक भाषेत प्रयोग करण्यासाठी हे वापरावं बाकी नाही हेच त्रिवार सत्य आहे, कारण गुरुत्वाकर्षण आहे म्हणून आपण चालतो, उभे राहतो, बसतो, गाडी चालवतो ई. हवा आहे म्हणून वायरलेस सिग्नल्स पोचतात इथून तिथे, ऐकू येतं, सगळी इंद्रिय काम करत आहेत म्हणून बोलता, ऐकता येतं. पचन क्रिया, विचार करण्याची ताकद कशी दिली जाते हे मानवाच्या हातात नाही, ते घडतं, आपोआप, कुठलाही मानवनिर्मित अल्गोरिदम न लिहिता. तरी देखील "मी" सारखा एक तर पुढे नाही तर मागे असतोच. का? "त्याच्या" पायी नतमस्तक व्हा आणि बघा तरी एकदा. अनुभव घ्या. "सगळं तुझंच" असं म्हणून तर बघा. "स्वानुभवातून आत्मप्रचीती" घेऊन बघा. मग उमजेल सत्य. अर्थात प्रचंड फायदेशीर होणार मग सर्वच.   

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०२४

२०८५: योजना


आज मी / आम्ही एक वेगळ्या दुनियेत भटकंती करून आलो, फेरफटका मारून आलो. तेव्हा ह्या एका नव्या योजनेबद्दल समजलं आणि तिच्या बद्दल हितगुज पण झालं. योजना म्हटलं कि सरकारी विविध तपशील, आखणी, बेत, आराखडा डोळ्यासमोर उभा ठाकतो. जीवन विमा, बँका पण विविध योजना नेहेमी राबवतो, आणतो बाजारात. सरकार अनेक योजना जाहीर करते, त्यांची अंमलबजावणी पण करते, अगदी तारीख वार सगळं व्यवस्थित सुरु असतं योजनेनुसार. एक डोक्यात आराखडा तय्यार होतो, मग तो वरिष्ठांसमोर मांडला किंवा सादर केला जातो, त्याचा अवधी काय, फायदा कोणाला ई. प्रश्नांची उत्तरे दिली जातात / शोधली जातात, त्या नंतर ती योजना जाहीर करणाऱ्यांना काय लाभ हे सुद्धा ध्यानात घेतलं जातं. हे सगळं होऊन जर होकार मिळाला तर मग ती योजना जाहीर होते, लोकांना कळते आणि आवडली तर त्यावर उड्या पडतात. 


मला तरी आजवर हे असं सगळं थोडक्यात माहिती होतं योजना ह्या शब्दाबद्दल. बास. 


हा शब्द म्हणजे अनेक टप्पे दर्शवणारा आहे, कारण योजना जरी एक असली तरी तिला राबवली जाते विविध टप्प्याने, वेगवेगळ्या पायऱ्या गाठल्या कि मग योजना पूर्ण होते, म्हणजे दोन्ही बाजुंनी, घेणाऱ्याच्या आणि देणाऱ्याच्या देखील. त्यामुळे वाक्यरचनेत किंवा अर्थानुसार माझ्या दृष्टीने हे क्रियापद असल्याचे दर्शवते. 


मी उडालेच जेव्हा हा शब्द म्हणजे एका मुलीचे नाव आहे हे समजलं. ती त्या नावाप्रमाणेच भासली, दिसली आणि तिच्या काही तास आम्ही क्रिया बघितल्या आणि ती काय भन्नाट आहे हे संपूर्ण ध्यानात आलं. ती असेल २५-२६ वर्षांची आणि इतके वर्ष आधी तिच्या आई वडिलांना तिचं असं इतकं वेगळं नाव ठेवावंसं वाटलं हे कित्ती वेगळं आहे. मला तर इतकं आवडलं ते कि मी तिच्याशी आदल्या दिवशी फोन वर बोलले तेव्हाच तिला सांगितलं, आज प्रत्यक्षात भेट झाली आणि माझ्या आनंदाला पार उरला नाहीच. मज्जा वाटली एकंदरीत आणि तिच्या पालकांची किंवा "त्याची" ह्या मागे काय योजना होती, आहे हे काही लक्षात आले नाही पण ती मात्र अगदी योजना आखून कामे करते, फारच आवडीने करते, सप्पाट्याने / लगबगीने करते, मस्त झोकून देऊन करते. एका नंतर एक रीघ लागली तरी तिची गती कमी होतांना दिसली नाही. आणि सरते शेवटी "शितावरून भाताची परीक्षा" हे ठाऊकच आहे आपल्याला. तेव्हा आम्ही जरी तिला साधारण एक दीड तास बघितली असली तरी ती लक्षात आलीच काय समीकरण आहे हे. मला खास भेटायला आली ती वरच्या मजल्यावर जेव्हा मी पोचल्यावर तिची चौकशी केली तेव्हा.  हि योजना "त्याने" आखली, रेखाटली आहे त्यामुळे प्रगती तर निश्चितच. मस्त भविष्यकाळ असणार ह्या योजनेला हे काही सांगायला नकोच, नाही का?  

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०२४

२०८४: वाढत्या अंगाचं


माझ्या लहानपणी हा शब्दांश मी अनेकदा ऐकला आहे, अनुभवाला पण हो. मी एकूलती एक कन्या असून सुद्धा हा शब्दांशासहीत मी जगले आहे. लहान मुलं म्हटली कि त्यांची वाढ झपाट्याने होत असते. त्यामुळे माझ्या लहानपणी घरचे सगळं वाढत्या अंगाचं घेण्याकडे कल ठेवायचे, बहुतांशी कपडे, चप्पल, दप्तर ई. म्हणजे जे काही खरेदी करायचं ते थोडसं, कणभर मोठ्या आकाराचं, म्हणजे ती वस्तू फक्त काही वेळ, किंवा फक्त त्या ठराविक काळात उपयोगात येत नाही तर थोडीशी जास्त तक धरून राहते, किंवा जास्त काळ उपयोगी पडते. असो. तेव्हा तसेच सर्वत्र सारखे वातावरण होते, सगळेच आईवडील असेच विचार करत होते आणि त्यात काही चुकीचे नव्हतेच. तेव्हा आर्थिक आणि सामाजिक पद्धती, रीती अश्याच असल्यामुळे ते तस्स पाळलं जायचं. 


आता बरेच बदल झालेत कारण सर्वार्थाने एक, दोन, तीन पिढ्यांचा काळ सरला आहे. 


पण तरी देखील मला आज हे का आठवलं सगळं? मी का भूतकाळाची सफर करून आले? सांगते. एवढ्यातच माझ्या नातीचा एक महत्वाचा वाढदिवस आहे, एक मैलाचा दगड, पाचवा. आणि अर्थात त्या वाढदिवसाला जाते वेळी मी काय घेऊन जाऊ तिच्यासाठी? ह्याचा मी विचार करू लागले. "वाढत्या अंगाचा" हा पहिल्यांदा विचार आला आणि एक सुंदर, नावीन्याने भरपूर असा ड्रेस घ्यावा असं मनात आलं. ते बघितलं पहिल्यांदा. मग म्हटलं अजून काही विविध प्रकार सध्या उपलब्ध आहेत, ती शाळेत जाते रोज तर वेगळे दप्तर, डब्बा, पाण्याची बाटली किंवा उपयुक्त असं काही? ते बघून झालं ऑनलाईन आणि दुकानात फेर फटका मारून पण जरी खूप सगळंच आवडतं असलं तरी काही घेणं झालं नाही. 


त्या नंतर खेळ, गेम्स, पाहायला सुरवात केली आणि खूप काही आवडलं. अर्थात पहिला प्रश्न दुकानदाराने विचारला दोन्ही कडे ऑनलाईन आणि ऑफलाईन, त्याच्या खास शैलीत "कोणासाठी बघताय?", वय सांगितलं तर त्याने फक्त वयानुरूप आणि साधारण मुलींना आवडतील, भावतील असे खेळ दाखवायला सुरवात केली.  मग मी मुलं मुली दोघी खेळू शकतील असे काही प्रकार बघितले. शैक्षणिक, बौद्धिक, खिळवून ठेवणारे, वेळ खाऊ, कलात्मक असे, सर्वांनी मिळून खेळणारे असे पहिले तेव्हा ४-५ पसंद पडले. मग साधारण बाकी सगळे पाहुणे असेच वयानुरूप आणतील खेळ, वस्तू, गिफ्ट्स, तेव्हा त्या भरपूर, रकाने भरून ठेवलेल्या वैविध्य गोष्टीतून मी काही निवडले. त्या वर नमूद केलेले वय बघितले, थोडक्यात वाचलं आणि ते घ्यायचं ठरवलं, आणि घेतलं देखील. ती गिफ्ट दोन भागात आहे. एकात साधं सोप्प असं दिलंय आणि दुसरं जरा चित्रमय करण्याचा प्रयत्न केला आहे. एकाला दुसऱ्याची जोड, किंवा भर नक्कीच आहे. शैक्षणिक गटात मोडणारे पण तिला ते सहा एक महिन्यांनी जास्त मस्त खेळता येईल आणि त्यानंतर बरेच दिवस ती ते खेळू शकेल असे "वाढत्या अंगांचे" आहे. 


ह्या सगळ्यांत मला माझ्या दोन लहान मुलांचे साजरे केलेले वाढदिवस आठवले. त्यात एकाच घरात एकाच वेळी एकाच वयाची दोन म्हणजे विचार करा दुप्पट भेटवस्तू येत असतं. नेमका त्यांचा वाढदिवस वार्षिक परीक्षेच्या आधी असे, त्यामुळे सगळेच गिफ्ट्स एका वेळी उघडायच्या नाहीत असं मी त्यांना सांगितलं आणि ते त्यांनी पाळलं देखील. कारण मग उन्हाळ्याच्या सुट्टीत काय करायचं हा यक्ष प्रश्न असायचा. त्यामुळे तो साठा सांभाळून ठेऊन एक एक उघडायचा म्हणजे नावीन्य टिकून राहतं, हा माझा आई म्हणून त्या मागचा विचार. मुलांनी ऐकलं आणि सगळं जमलं व्यवस्थित. तसेच माझ्या नातीला पण भरभरून भेटवस्तू येणारंच. तेव्हा माझी भेट जरा काही दिवसांनी, महिन्यांनी उघडली तर जास्त मज्जा येईल सर्वांनाच. एकाच वयोगटातील, फक्त त्याच वेळी कामी येणारी भेट हा एक पर्याय, आणि थोड्या दिवसांनी हा दुसरा. मी ह्या वेळी पण दुसरा निवडला. तिला ह्या खेळाचा निश्चित उपयोग होणार. तिच्या मोठ्या बहिणीसोबत, आई बाबांसोबत, आजी आजोबांना घेऊन खेळावा असा मजेशीर, रंगीत असा साधा खेळ आहे दोन भागात. 


म्हणून माझी आई नेहेमी म्हणायची, अर्थात हे मोठ्यांच्या भेटवस्तूंना जास्त उपयुक्त आहे. कि हि जी सगळी भागदौड आहे, विचार आहे, कृती आहे, ऑनलाईन ऑफलाईन जाऊन बघून ठरवणे आहे हि  खरी भेट, ती फक्त वस्तू. 

2083: A Perfect Example of Lateral Thinking



Lately, I’ve been fully immersed in conducting research writing workshops, focusing intensely on the value of lateral thinking. To me, lateral thinking goes beyond traditional “out of the box” ideas—it's about approaching problems from fundamentally different perspectives. I frequently share insights from renowned authors who have explored this powerful approach.

Today, I encountered an advertisement for an investment app called StableMoney that exemplifies this beautifully. This app allows users to invest in fixed deposits from multiple banks without needing a savings account with each one. Remarkable, isn’t it? Conventional wisdom, backed by longstanding RBI regulations, dictates that linked accounts are essential for such investments. But this app challenges that standard through a unique model, harnessing technology and creative structuring in a way that breaks with tradition.

Could such a concept have emerged from mere innovative thinking? Likely not. This is lateral thinking in action—thinking that disrupts norms to create entirely new pathways. Once again, this underlines my message in workshops: lateral thinking can unlock success in any field, even in research and writing. So, keep attending and supporting these workshops; let’s explore what lateral thinking can accomplish together.

hashtagResearchWriting hashtagResearchPapers hashtagPhDScholars hashtagResearchWriting hashtagOpenAITools hashtagSmartWritingWorkshops hashtagOpenAIForWriting hashtagResearchArticles hashtagReviewArticles hashtagLateralThinking hashtagHandsonWorkshops

रविवार, ३ नोव्हेंबर, २०२४

2082: Ignorance is Bliss


A professor, a hotel singer, and a world-renowned classical musician have all taught me invaluable lessons. My professor had been imparting this lesson for years, though it took time for me to grasp the deeper meaning behind it. This particular professor—brilliant, famous, and extraordinarily wise—had a unique approach. He would often teach with his eyes closed, opening them only occasionally. He paid no mind to students who might be daydreaming or ignoring his words; he simply focused on delivering his lesson. He was there to teach, and that alone was his purpose.

Recently, I watched the latest season of Indian Idol on Sony. One contestant, an immensely talented singer with a foundation in folk music, shared that he performs regularly with his troupe at hotels. Yet, despite their skill, their music is often treated as mere background noise, unnoticed by guests. They aren’t even acknowledged, he said. But they find motivation within themselves, enjoy each other’s company, and fulfill their duty to perform, regardless of the audience’s attention.

This lesson came full circle when I attended a Diwali morning music retreat, where a world-class classical musician performed. Amidst the distractions of people moving around, snapping photos, chatting, and scrolling through their phones, he remained entirely unbothered. He was deeply immersed in his art, finding fulfillment in the music itself, focused on his craft and class rather than the response of those around him.

As a teacher, I sometimes feel distracted or disheartened without my students’ undivided attention. But these examples have shown me the beauty of staying focused on one’s purpose, regardless of external distractions. Indeed, ignorance is bliss. Focus on your duty and let go of the rest.

2081: A Reflection on an Important Truth



In my workspace, within our close-knit circle, we had a habit of calling each other by our initials. It wasn’t for any specific reason—it just became our unique way of interacting, and we enjoyed that little quirk. At the end of each workday, as we walked out of the office and headed home, we’d often cross paths with others, exchanging goodbyes. Some would watch me walk and tease, “PM, why are you walking so slowly?” They meant it with humor and affection, and I’d always respond, “Well, see, it’s thanks to me that you notice your own speed. My slow pace gives you a chance to appreciate your fast one! So, a big thank you to me.” This exchange became a regular part of our day. Due to a major issue with my leg, my pace had slowed to almost a crawl, but that’s all in the past now.

I bring up those memories because they remind me of a broader observation about life in my generation, especially for middle-class families in India—the largest demographic. For many women, a career was a balance between family responsibilities and work. Many of us chose jobs with fixed hours, as our commitments at home took priority. These time-bound roles often came with lower pay, especially compared to our husbands, who could invest more time in their careers. They could focus consistently, take fewer breaks, and maintain their health, allowing them to earn more. And, in a way, a significant part of their success could be attributed to us, their wives, who chose to work within limitations, contributing as a secondary source of income.

From my perspective only, that difference in earnings between husband and wife often stems from her choices—choices made to support the family as a whole (popularly referred as secondary (income)). While there are exceptions, they are few and far between in this reality.

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...